व्वा… व्वा…जोडपं असावं तर असं! अवघ्या १५० रुपयांत केले अभिनेता विराफ पटेलने सलोनी खन्नासोबत लग्न, घातली रबराची अंगठी

Actor viraf patel and saloni khanna married in only 150 rupees


कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सर्वांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे. या सोबतच महाराष्ट्र शासनाने अनेक कार्यक्रमांवर बंधनं लादली आहेत. लग्नावर देखील बंधनं आली आहेत. केवळ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न समारंभाचे नियम सरकारने जाहीर केले आहेत. खरं तर आपलं लग्न धूमधडाक्यात व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण या कोरोनामुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले आहे, तर काही कलाकारांनी त्यांचे लग्न त्यांच्या मनासारखे करण्यासाठी पुढे ढकलले आहे. परंतु टेलिव्हिजनवरील ‘नामकरण’ या मालिकेतील अभिनेता विराफ पटेल याने त्याचे लग्न याच काळात केले आहे.

नुकतेच विराफ पटेल आणि सलोनी खन्ना हे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांनाही हटक्या अंदाजात लग्न केले आहे. आजकाल बी टाऊनमध्ये ग्रँड पद्धतीने लग्न होतात तिथेच या दांपत्याने केवळ 150 रुपयांत लग्न केले आहे.

विराफ आणि सलोनी यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांनी मुंबईमधील वांद्रे कोर्टामध्ये लग्न केले आहे. या कोर्ट मॅरेजमध्ये देखील ते दोघेही अत्यंत सध्या पोशाखात दिसत आहेत. विराफने सांगितले की, “आम्ही केवळ 150 रुपयांत लग्न केले आहे. आम्ही मॅरेज रजिस्टरसाठी 100 रुपये दिले आणि फोटोसाठी 50 रुपये दिले आहेत.”

सलोनीने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “रबर बॅंडची अंगठी, उधार घेतलेली साडी, साक्षीदार, शेवटच्या क्षणी कुटुंब आणि मित्रांसोबत शृंगार. 150 रुपयांत लग्न करून आम्ही बाहेर. पैसा वसूल शादी कबूल.”

असं‌ म्हणतात की, विराफ पटेलने त्याच्या लग्नासाठी जमवलेले पैसे त्याने कोरोना रुग्णांसाठी दिले आहेत. पण या गोष्टीची कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर अली नाहीये.

विराफ पटेल याने सांगितले की, “त्याच्या लग्नासाठी त्याने अंगठी देखील घेतली नव्हती. त्यामुळे त्याने रबरबॅंडचा वापर केला. लग्न किती धूमधडाक्यात होतंय याला महत्व नाही, नात जुळते याला महत्व आहे.” त्यांनी अशाप्रकारे लग्न केले. यासाठी त्यांचे चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत, तसेच त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.

विराफ आणि सलोनी यांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाईन शोमध्ये झाली होती. त्यांनतर त्या दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस


Leave A Reply

Your email address will not be published.