Tuesday, September 26, 2023

ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

हिदी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या खोसला कुमार होय. हिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याशिवया ती निर्माती देखील आहे. दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या नुकत्याच एका पोस्टमुळे समजले आहे की, अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिने पोस्ट शेअर करत तिचे दु:ख चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या (Divya Khosla Kumar) हिच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच दिव्याच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिनेत्री दिव्या खूपच हळहळली आहे. दिव्याने तिच्या आईसोबत काही फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. इन्स्टाग्रामवर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट दिव्याने लिहिली आहे.

अभिनेत्री दिव्याने तिच्या आईचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “काही वेळापूर्वी मी माझी आई गमावली, ज्यामुळे माझ्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. मी तुझे आशीर्वाद आणि तु सांगितलेली नैतिक मूल्ये मी कायम लक्षात ठेवेल. माझी सर्वात सुंदर आई.. तुझ्या पोटी जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आई… ओम शांती”

दिव्याच्या या पोस्टवर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोनालिसा, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक स्टार्सनी अभिनेत्रीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अनेक सोशल मीडिया यूजर्स या पोस्टवर ओम शांती लिहित आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

दिव्या कुमार खोसला विषयी बोलायच झाल तर, तिने अतिशय उत्तम रित्या अभिनय करुन प्रसिद्धी मिळवली आहे. तिने नुकतीच ‘यारियां २’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाद्वारे दिव्या सात वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. ‘सनम रे’ हा दिव्याने दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता.

अधिक वाचा- 
– कलाकारांना मोठी संधी! ‘या’ ग्रुपने आयोजित केली लघुपट स्पर्धा
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “तुमच्या…”

हे देखील वाचा