Saturday, July 27, 2024

तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटातून पुनरागमन करतेय दिव्या खोसला कुमार, म्हणाली, ‘जोखीम घेण्याची हिंमत…’

सन २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ हा चित्रपट तर सर्वांनाच आठवत असेल, नाही का? या चित्रपटात जबरदस्त कलाकारांचा भरणा होता. जसे की, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, बॉबी देओल, नगमा, अमरीश पुरी, आशुतोष राणा यांसारखे कलाकार होय. यांमध्ये आणखी एक अभिनेत्री होती, जिने या चित्रपटातून खूप ओळख मिळवली. ती अभिनेत्री म्हणजेच, दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) होय. आता दिव्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तिने तब्बल १७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ती अभिनेता जॉन अब्राहमसोबत (John Abraham) ‘सत्यमेव जयते २’ (Satyamev Jayate 2) या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत पुनरागमनाबाबत  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाला आहे, कोणत्या गोष्टीचा तणाव आहे का?
या प्रश्नाचे उत्तर देताना दिव्या म्हणाली की, “बॉक्स ऑफिस कलेक्शन तणावपूर्ण आहे. प्रदर्शनाचे तीन दिवस चित्रपटासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या चित्रपटातील माझे काम मला आवडल्यानंतरच निर्माता-दिग्दर्शक मला पुढील अभिनयासाठी संपर्क करतील. बॉक्स ऑफिस कलेक्शनला खूप महत्त्व आहे.” (John Abraham’s Satyamev Jayate 2 Fame Actress Divya Khosla Kumar Talks About Her Come Back After 17 Years)

तब्बल १७ वर्षांनी अभिनयात पुनरागमन करण्यामागे काय कारण होते?
तब्बल १७ वर्षांनी अभिनयात पुनरागमन करण्यामागील कारण विचारले असता ती म्हणाली की, “मी दिग्दर्शन करत होते, पण ‘सनम रे’ चित्रपटानंतर आता ब्रेक घेऊन अभिनय करायचं ठरवलं. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मला हा चित्रपट २०१९ साली मिळाला. या भूमिकेसाठी जेव्हा मिलाप झवेरी यांनी मला संपर्क केला, तेव्हा मी त्यांना एवढेच सांगितले की, माझ्या पात्रात काहीतरी खास असले पाहिजे. फक्त चित्रपट करायचा आहे, त्यामुळे कोणत्याही पात्राला हो म्हणायचे नाही. मिलाप म्हणाले की, मी तुझ्यासाठी खूप सशक्त भूमिका लिहिली आहे. जेव्हा मी स्वत:ला पडद्यावर पाहिलं, तेव्हा मला वाटलं की या व्यक्तिरेखेत मी स्वत:ची कल्पनाच करू शकत नाही. मी माझ्या विद्या या पात्रापेक्षा खूप वेगळी आहे. विद्या एक राजकारणी आहे, खूप मजबूत आहे, मी एक भावनिक मुलगी आहे. त्याचे गुण मला स्वतःमध्ये आणायचे आहेत.”

तुम्ही अनेकदा म्हणता की, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप जोखीम पत्करली आहे, त्याबद्दल सांगाल?
“मी दिल्लीची आहे. मी मुंबईत आले, तेव्हा अवघ्या १७ वर्षांची होते. मला अभिनेत्री किंवा दिग्दर्शक व्हायचे आहे, असा विचार करून मी आलेले नव्हते. मी सर्जनशील आहे, म्हणून मला काहीतरी सर्जनशील कार्य करावे लागेल अशी भावना होती. पहिल्याच चित्रपटात काम केल्यानंतर खूप काही शिकण्यासारखे आहे, असे वाटले. यामुळे मी दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी शिकले. यालाच करिअरमध्ये जोखीम घेणे म्हणतात,” असे ती पुढे म्हणाली.

“‘यारियां’ आणि ‘सनम रे’ दिग्दर्शित केल्यानंतर मी अभिनयात परतण्याचा निर्णय घेतला. ही चांगली वेळ आहे, कारण उत्तम कथा लिहिल्या जात आहेत. जोपर्यंत मला माझी कला दाखवण्याची संधी मिळत नाही, तोपर्यंत मी असमाधानी राहते. म्हणूनच मी काम शोधले, म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले, दिग्दर्शन केले,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

चित्रपटातील राजकारण्याच्या भूमिकेसाठी कशी तयारी केलीस?
“बरेच लोक मेथड ऍक्टिंग करतात, जेणेकरून ते पात्र बनतात. मलाही ते पात्र व्हायचं आहे, पण त्यासाठी मी ते आयुष्य जगायला सुरुवात करत नाही. माझ्या आयुष्यात नवरा, मुलगा, घर आहे. मी स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ असणारा अभिनय करते,” असे ती आपल्या भूमिकेबाबत म्हणाली.

दिव्याच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘यारियां’ आणि ‘सनम रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका पार्टीनंतर ‘असे’ बदलले अर्जुन रामपालचे अवघे आयुष्य, पाहा कसा केला मॉडेल ते अभिनेत्याचा प्रवास

-अमिताभ बच्चन यांना ‘वाईट व्यक्ती’ समजू लागली होती करीना कपूर, बिग बींनी पाय धुतल्यावर बदलले मत

-‘ज्यांना पुरस्कार मिळत नाही यांच्यासाठीच पुरस्कार महत्वाचे नसतात’, म्हणत अभिषेक बच्चनने मांडले पुरस्कारांवर मत

हे देखील वाचा