ऐश्वर्या आणि अभिषेक बॉलिवूडचे असे एक जोडपे आहे, ज्यांनी त्यांचे लग्न खूप चांगल्याप्रकारे निभावले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांचे हे लग्न उदाहरण म्हणून दिले जाते. २००७ साली ऐश्वर्या आणि अभिषेक हे लग्नबंधनात अडकले होते. ज्याच्या काही काळानंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला होता.
लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही दोघे कोणत्याही कार्यक्रमात सोबत दिसतात. असे खूप प्रसंग आले, जिथे दोघांनी आपल्या लग्नाविषयी गोष्टी केल्या. जिथे दोघांनी आपले अनुभव मनसोक्त सांगितले. एका मुलाखतीत दोघांनी सांगितले, लग्नानंतर त्यांच्यातही खूप भांडणे झाली. अभिषेकने सांगितले की, ऐश्वर्यासोबत भांडण मिटवायला तो तिची नेहमी माफी मागायचा. (Actress Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Shares Their Fights After Marriage)
अशाचप्रकारे ऐश्वर्या राय बच्चननेही काही खुलासे तिच्या मुलाखतीत केले आहेत. ऐश्वर्याला “तुमच्यामध्ये लग्नानंतर भांडणे व्हायची का?” असे विचारल्यानंतर तिने सांगितले की, “आमच्यामध्येही रोज भांडणे व्हायची. ऐश्वर्याने हेही सांगितले की, ही केवळ भांडणे नसून आमच्यामधील मतभेद असायचे. ती पुढे म्हणते की, जर काही भांडणे असती, तर त्यांचे हे लग्न खूप कंटाळवाणे झाले असते, तर दुसरीकडे अभिषेक बच्चनने सांगितले की, “सगळ्याच भांडणात स्त्रिया ऐकत नाहीत.”
यावर अभिषेक असे बोलतो की, त्यांनी असा एक नियम बनवला होता की, भांडणादरम्यान ते कधीही सोबत झोपणार नाही. तो पुढे बोलतो की,
“जास्त करून भांडणांमध्ये आम्ही एकमेकांची माफी मागायचो. कारण, आम्हाला खूप झोप आलेली असायची.” शेवटी तो म्हणतो की, “स्त्रिया नेहमी बरोबर असतात, हे आपण जेवढे लवकर आत्मसात करू, तेवढे आपल्यासाठी चांगले आहे.”
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘गुरू’, ‘सरकार राज’, ‘धूम २’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘उमराव जान’, ‘कुछ ना कहो’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक
-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे
-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’