Tuesday, May 21, 2024

धक्कादायक! संगीतकार किशोर ब्रिज दुबे यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

बिहारमधील प्रसिद्ध लोकगायक आणि संगीतकार ब्रिज किशोर दुबे यांची हत्या करण्यात आली आहे. पाटणा येथील केसरी नगर येथे अजंता काॅलनीमध्ये राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. ब्रिज किशोर दुबे हे भोजपुरीचे प्रसिद्ध संगीतकार होते आणि राष्ट्रपतींनीही त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

ब्रिड किशाेर दुबे यांचा बाथरूममध्ये आढळाल मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिज किशोर दुबे (brij kishor dubey) हे पाटणा येथील पोल्सन रोड, दिघा येथे राहत होते. ते त्यांचा मित्र रवींद्रकुमार मिश्रा यांच्या अजिंठा कॉलनीतील घरी गेले. सोमवारी (14 नाेव्हेंबर)ला त्याच घरातील बाथरूममधून त्याचा मृतदेह सापडला. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांचे पाय बांधले होते आणि त्यांचे डोके पाण्यात बुडाले होते. प्राथमिक तपासात त्यांची हत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ब्रिज किशाेर दुबे यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर काेसळले दु:खाचे डाेंगर
ब्रिज किशोर दुबे यांच्या निधनानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ब्रिज किशोर दुबे यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मृत ब्रिज किशोर दुबे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचे डाेंगर काेसळले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.

पाेलिस घेत आहे घटनेचा तपास
मात्र, रवींद्र मिश्रा सध्या पाटण्यात नसल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रिज किशोर यांनीच रवींद्रकडे त्यांच्या खोलीची चावी मागितली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत असून लवकरच या प्रकरणाचा खुलासा करतील. (story famous musician brij kishor dubey murdered in patna dead body found in friend house bathroom)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्याला लेकीला किस करणे पडले महागात, युजर्सने केले ट्राेल

प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला ‘या’ कारणामुळे करायचे नव्हते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम

हे देखील वाचा