उर्फी जावेदचा इस्लामवर नाही विश्वास; म्हणाली, ‘मुस्लिम मुलाशी कधीच लग्न करणार नाही’


बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात बाहेर पडलेली उर्फी जावेद ​​(Urfi Javed) आज फॅशन दिवा बनली आहे. उर्फीचे अतरंगी आणि बोल्ड आउटफिट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवतात. उर्फीच्या वाढत्या लोकप्रियतेचे संपूर्ण श्रेय तिचे कपडे आणि ड्रेसिंग सेन्सला जाते. आता माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत उर्फीने तिच्या ट्रोलिंग, लग्नाच्या योजना आणि लव्ह लाईफबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगितल्या.

इंटरनेट सेन्सेशन उर्फी एका पुराणमतवादी मुस्लिम कुटुंबातील आहे. पण तरीही तिला मुस्लिम मुलाशी लग्न करायचे नाही. उर्फीने असेही सांगितले की, ती आजकाल भगवतगीता वाचत आहे. उर्फीने मुलाखतीत सांगितले की, “मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लामला मानत नाही आणि मी कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. म्हणूनच मी कोणावर प्रेम करते याची मला पर्वा नाही. आपल्याला आवडेल त्याच्याशीच लग्न केले पाहिजे.”

उर्फीने सांगितले की, तिला बोल्ड लूकसाठी ट्रोल केले जाते कारण तिचा इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नाही. विशेषतः ती मुस्लिम असल्यामुळे ट्रोलिंग होते. उर्फी म्हणाली की, “मी मुस्लिम मुलगी आहे. म्हणूनच मला बहुतेक द्वेषयुक्त टिप्पण्या फक्त मुस्लिम लोकांकडूनच मिळतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करत असल्याचे ते म्हणतात.”

उर्फी म्हणाली की, “मुस्लिम मुले माझा तिरस्कार करतात कारण त्यांना त्यांच्या महिलांनी विशिष्ट पद्धतीने वागावे असे वाटते. त्यांना त्यांच्या समाजातील प्रत्येक स्त्रीवर नियंत्रण ठेवायचे आहे. यामुळे मी इस्लामला मानत नाही. ते मला ट्रोल करतात कारण ते धर्मानुसार माझ्याकडून जी अपेक्षा करतात तसे मी वागत नाही.” उर्फी पुढे म्हणाली की, “माझे वडील खूप परंपरावादी होते. जेव्हा मी १७ वर्षांची होते, तेव्हा ते माझ्या आईला आणि आम्हा सर्वांना सोडून गेले. माझी आई खूप धार्मिक स्त्री आहे, पण तिने कधीच आपला धर्म आमच्यावर लादला नाही.”

उर्फी पुढे म्हणाली की, “माझे भाऊ आणि बहिणी इस्लामचे पालन करतात, पण मी करत नाही. यासाठी त्यांनी माझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही आणि तसे असावे. तुम्ही तुमचा धर्म तुमच्या पत्नी आणि मुलांवर लादू शकत नाही. सर्व काही हृदयातून आले पाहिजे, अन्यथा तुम्ही किंवा अल्लाह दोघेही आनंदी होणार नाहीत.” उर्फी पुढे म्हणाली की, “मी सध्या भगवतगीता वाचत आहे. मला धर्म (हिंदू धर्म) बद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.”

‘बिग बॉस १४’ मध्ये डस्टबिनच्या पिशव्यांमधूनही तिने कपडे बनवले होते. एका टास्कदरम्यान तिची फॅशन दाखवताना ती अंगावर काळे प्लास्टिक गुंडाळताना दिसली. त्यावेळी तिच्या टॅलेंटचे अनेकांनी कौतुक केले होते.

हेही वाचा-

अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा झाला अपघात; लोकांनी पकडली ड्रायव्हरची कॉलर मग पुढे…

धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबीचा फोटो केला शेअर, नंतर मागितली सर्वांची माफी; पण का?

अंधारात टॉर्च लावून ईशा गुप्ताने दिल्या ‘अशा’ पोझ, बाथरूममधील व्हिडिओ आला समोर


Latest Post

error: Content is protected !!