अभिनेत्री ऐश्वर्याने शेअर केला समुद्र किनाऱ्यावरील भन्नाट फोटो, कॅप्शनमध्ये ‘बराक ओबामा’ यांच्या पत्नीचा उल्लेख

Actress Aishwarya rajesh share her Maldives photo on social media


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राजेश हिने काही दिवसांपासून ब्रेक घेतला आहे. तरीही, सोशल मीडियावर मात्र ती तिच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा खुलासा ती प्रेक्षकांना देत असते. समुद्र किनाऱ्यावरील भन्नाट तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या सध्या मालदीवमध्ये तिच्या कुटुंब सोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने येथील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती खूपच खुश दिसत आहे. तिच्या सगळ्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आणि स्टाईल खूप आवडली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून खूप कमेंट येत आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, ऐश्वर्याने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने एक कॅप्शन देखील लिहिले आहे. यामध्ये ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचा उल्लेख केला आहे.

कॅप्शनमध्ये तिने असे लिहले आहे की, “मिशेल ओबामा अगदी बरोबर म्हणतात की, महिला काहीही करू शकतात, त्यांना काहीच सीमा नसते.” ऐश्वर्याच्या फोटोसोबत तिचे हे कॅप्शनचीही चर्चा होत आहे. याव्यतिरिक्त ती म्हणते की, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी मालदीवला भेट दिली पाहिजे.

या आधी देखील ऐश्वर्याने जेट स्कीइंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडिओलाही चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-आहा! सपना चौधरीच्या मुव्ह राखी सावंतने केल्या होत्या कॉपी, पाहा एकाच स्टेजवर दोघींचा जबरदस्त डान्स

-‘पउआ ना समझो…’ गाण्याची इंटरनेटवर धमाल, मिळालेत २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.