आहा! सपना चौधरीच्या मुव्ह राखी सावंतने केल्या होत्या कॉपी, पाहा एकाच स्टेजवर दोघींचा जबरदस्त डान्स

Actress Rakhi Sawant and sapna chaudhri together dance on bhojpuri song


सपना चौधरी ही हरियाणवी डान्स स्टाईलसाठी खूपच प्रसिद्ध आहे, तर राखी सावंतने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग करून प्रसिद्धी मिळवली आहे. या दोन्हीही अभिनेत्री त्यांच्या डान्स स्टाईलमुळे खूपच नावाजलेल्या आहेत. या दोघीही बिग बॉस शोमध्ये स्पर्धक होत्या, आणि तिथेच त्यांची ओळख झाली. राखी आणि सपना सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. नुकताच या दोघींचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघी एका स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत.

सपना चौधरीने पंजाबी आणि हरियाणवी गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले आहे. जेव्हा सपनासोबत बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने आपल्या बोल्ड अंदाजात डान्स केला, तेव्हा मात्र प्रेषक त्यांच्यावरून नजर हटवू शकले नाही. या गाण्यातील दोघींचीही लटके झटके बघण्यासारखे आहे. खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये राखी सावंतला सपनाच्या डान्स स्टेप्स कॉपी कराव्या लागल्या आहेत. त्या दोघींनी ‘तेरी आंख्या का यो काजल’ या हरियाणवी गाण्यावर डान्स केला आहे.

सपना चौधरीचे ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणे तिच्यासाठी खूप खास आहे. अनेक कलाकारांनी या गाण्यावर डान्स केला आहे. राखी सावंतसोबत केलेल्या तिच्या या डान्सला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

पण लवकरच एँड टीव्हीवरील ‘मौका ए वरदात’ या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या शोमध्ये ती रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासोबत दिसणार आहे. हो शो 8 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता दाखवला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार


Leave A Reply

Your email address will not be published.