व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

Mauni Roy dance on English song shavar video viral on Instagram


मौनी रॉय ही बॉलिवूडमधील एक गाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात ती कोणतीही कसर सोडत नाही. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असताना दिसते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती सर्वत्र खूपच प्रसिद्ध होत असते. तिचा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असतो. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिची मैत्रीण गायक ‘बेकी जी के’च्या ‘शावर’ या गाण्यावर डान्स करत आहे.

मौनीने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. मौनी आणि तिच्या मैत्रिणीने काळया रंगाचा ड्रेस घातला आहे. या गाण्यात त्यांच्या स्टाईलसोबत त्यांचे हावभाव देखील बघण्यासारखे आहेत. तिच्या या इंग्रजी गाण्यावरील डान्स व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

असे व्हिडिओ शेअर करण्याची ही मौनीची पहिली वेळ नाहीये. याआधीही मौनीने आपले असे अनेक व्हिडिओ शेअर करून सगळ्यांचे मन जिंकले आहे. तिच्या या पोस्टवरून तिचा फॅशन सेन्सबद्दल देखील माहिती मिळते.

मौनी लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील असणार आहे. या आधी तिची ‘लंडन कॉन्फिडेन्शिअल‌’ ही वेबसीरिज रिलीझ झाली होती. तिच्या या वेबसीरिजला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे.

तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनीने ‘मेड इन चायना’ या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार

-आमिर आणि एलीचं ‘हे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स मुव्ह पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हिडिओ

-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच


Leave A Reply

Your email address will not be published.