‘पउआ ना समझो…’ गाण्याची इंटरनेटवर धमाल, मिळालेत २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

Bhojpuri singer rajesh Mishra's new song realeased


भोजपुरी संगीत क्षेत्रातील सुपरस्टार राकेश मिश्राने एका पेक्षा एक हिट गाणी देऊन संगीत क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘ए राजा रंग डाली ना भितरिया’, ‘खेला भऊजी होली’ त्याच्या या गाण्यांनी खूपच कमाल केली आहे. या गाण्यांच्या यशानंतर त्याचे नुकतचे होळीनिमित्त एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

त्याचे ‘पउआ ना समझो बोतल का मजा’ हे नवीन गाणे इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. राकेश मिश्राचे हे गाणे म्युझिक वाईड यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे. या गाण्याला आतापर्यंत २० लाखांपेक्षाही अधिक वेळा बघितले गेले आहे.

या गाण्याला मिळणाऱ्या प्रचंड यशानंतर राकेश मिश्रा यांनी असे म्हटले आहे की, “तुम्ही दिलेल्या एवढ्या भरभरून प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या या भावावर असंच प्रेम करत राहा. माझी सगळी गाणी मी तुमच्यासाठीच गात आहे. तुमचे मिळणारे हे आशीर्वाद माझ्यासाठी एक प्रेरणा आहे.”

राकेश मिश्रा आणि महिमा सिंग यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. छोटान मनीष यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. प्रियांशु सिंग यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. दोघेही या गाण्यात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. सिंटू यादव यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. पंकज सोनी यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. तसेच या गाण्याची निर्मिती नीरज सिंग यांनी केली आहे.

होळी जवळ आली आहे, आणि होळीच्या मुहूर्तावर राकेश यांची अनेक गाणी त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. त्यांचं प्रत्येक गाणे रिलीझ होताच व्हायरल होताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार


Leave A Reply

Your email address will not be published.