ऐकलंत का! अक्षराने मुलांना म्हटले ‘धोखेबाज’, म्हणाली, ‘आधी खोटे बोलतात, मग पटवतात आणि नंतर…’


भोजपुरी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आज कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. त्यांनी आपल्या अस्सल अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक म्हणजे अक्षरा सिंग होय. अक्षराने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. इतकेच नाही, तर चाहते अक्षराच्या आवाजाचेही दीवाने आहेत. ती अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते. एकेकाळी तिचे नाव भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबतही जोडले गेले होते. दोघांनीही एकमेकांना दीर्घकाळ डेट केले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. मात्र, त्यांच्या प्रेमाचा शेवट वाईट झाला. यादरम्यान तिने आपले नाते आणि पवनबाबत खूप काही म्हटले होते. अशातच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत अक्षराने मुलांसाठी आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Actress Akshara Singh Said On The Relationship That Ladke Dhokebaaj Hote Hai)

खरं तर, अक्षराचा एक जुना व्हिडिओ तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा मुलांना फसवणूक करणारे सांगत आहे. अक्षरा सिंग तिच्या परफॉर्मन्ससाठी एका स्टेजवर उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा “मुलं फसवणूक करतात. आधी खोटे बोलतात, मग पटवतात आणि नंतर? नंतर काय बोलतील ते तुम्हाला माहितीच आहे,” असे म्हणताना दिसत आहे.

अक्षराचा हा व्हिडिओ शेअर करत फॅन पेजकडून लिहिण्यात आले आहे की, “प्रेमाच्या प्रत्येक गल्लीत विकले आहेत, ही मुले कधीच एका मुलीवर टिकले नाहीयेत.”

अक्षरा सिंग आणि पवन सिंग एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. असा दावा केला जातो की, अक्षराला पवनसोबत लग्न करायचे होते, पण दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अक्षराने पुढे येऊन पवन सिंगवर अनेक गंभीर आरोप केले. अक्षराने पवनवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप केला होता.

अक्षराने म्हटले होते की, “पवन सिंग तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने ज्योती सिंगसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतरही त्याला तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे होते.”

अक्षराच्या या वक्तव्यामुळे दोघेही वादात सापडले होते. मात्र, आता दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे

-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’


Latest Post

error: Content is protected !!