Saturday, July 6, 2024

मुलीच्या जन्माबद्दल भारती सिंगने रणबीर-आलियाचे केले अभिनंदन, म्हणाली…

बॉलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर आणि आलियाचे हे पहिलेच अपत्य आहे, तर कपूर कुटुंबातही बऱ्याच काळानंतर एका बाळाचा जन्म झाला आहे. अशा परिस्थितीत कपूर आणि भट्ट दोन्ही कुटुंब खूप आनंदी आहेत. फॅन्स आणि सेलेब्स आलिया-रणबीरचे अभिनंदन करत आहेत. तर दुसरीकडे आजी आणि ज्येष्ट अभिनेत्री नीतू कपूरही खूप खुश आहे.

रविवारी (दि. 6 नाेव्हेंबर)ला सकाळी आलिया (Alia Bhatt) हिने मुंबईतील रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. जन्मानंतर काही वेळातच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. तिने आपल्या मुलीला जादुई म्हटले आहे. यानंतर अभिनंदन करण्यासाठी सेलिब्रिटींची झुंबड उडाली. श्वेता बच्चन(Shweta Bachchan Nanda)
, अक्षय कुमार(Akshay Kumar), अयान मुखर्जी (Ayan Mukerji)सह अनेक स्टार्सनी आलिया आणि रणबीर (Ranbir Kapoor) याचे अभिनंदन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

अलीकडेच भारती सिंग (Bharti Singh), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), शंकर महादेवन (Shankar Mahadevan)आणि पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी आलिया आणि रणबीरला पालक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भारती सिंह हिने शुभेच्छा देत सांगितले की, “त्यांच्या घरात एक छोटी गोली झाली आहे. ते आता खूप मजा करणार आहे आणि दोघेही पालक बनण्याच्या या टप्प्याचा खूप आनंद घेणार आहेत.” ते पुढे म्हणाले की, “माझा मुलगा मोठा कार्यकर्ता आहे आणि त्याची मुलगीही अशीच निघेल.”

त्याचवेळी शंकर महादेवन यांनीही दोघांचे अभिनंदन करत मुलीला खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.(alia bhatt ranbir kapoor baby girl came bharti singh mithun chakraborty and these stars congratulated them)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये भाग्यश्री-भूमिका चावलाची एन्ट्री?

अय्याे! असे काय घडले की, उर्फी दिसली बॅंडेज पट्टीमध्ये गुंडाळलेली

हे देखील वाचा