आलिया भट्टने व्हिडिओ शेअर करत केली फिटनेस ट्रेनरची तक्रार, पण का? जाणून घ्या कारण


हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खूप कमी काळात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपले एक स्थान निर्माण केले आहे. यांपैकीच एक म्हणजे देखणी आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट होय. आलियाने मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच सोशल मीडियावरही आलियाचा चांगलाच वावर आहे. ती नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोंमधून ती आपल्या फिटनेसबाबत किती जागरूक आहे हेही दिसते. अशातच आता तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. (Actress Alia Bhatt Shares A Workout Video And Complained Her fitness Trainer And Said He Lied To Me)

आलियाने नुकताच अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. खरं तर आलियाच्या फिटनेस ट्रेनरने आपल्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत आलिया जिममध्ये बारबेल हिप थ्रस्टचे सेट मारताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत आलियाच्या ट्रेनरने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “नेहमीच खोलीमध्ये सर्वात कठीण कार्यकर्ते बना. प्रामाणिकपणे मला वाटते की, मला हे तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही. आपण हे तसेही करता.”

आलियाने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत फिटनेस ट्रेनरची तक्रा केली. आलियाने आपल्या स्टोरीवर लिहिले की, “तुम्ही तो भाग सोडला, जिथे तुम्ही मला वजनाबद्दल खोटे बोलला होता.” तिचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

Photo Courtesy: Instagram/ialiaabhatt

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे. या एकाच चित्रपटाने तिला खूप वेगळी ओळख मिळाली.

यानंतर तिने ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘हाय वे’, ‘गिल्ली बॉय’, ‘कलंक’, ‘राजी’, ‘शानदार’, :कपूर एंड सन’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती ‘आरआरआर’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातही दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.