लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर


पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका साकारताना दिसतात. या कलाकारांमध्ये आवर्जुन घ्यावे असे नाव म्हणजे अभिनेता सोनू सूद होय. मागील वर्षीपासून कोरोना व्हायरससारख्या भयानक महामारीदरम्यान सोनू सूद दिवस- रात्र गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी झगडताना दिसत आहे. मजुरांना घरी पोहोचवण्यापासून ते रुग्णांना बेड मिळवून देईपर्यंत शक्य ती मदत सोनूने केली आणि अद्याप करतोय. यादरम्यानचे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता त्याचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वत:चे सुपरमार्केट सुरू करण्याची बातमी लोकांना देत आहे. इतकेच नव्हे, तर सोनूने या सुपरमार्केटमध्ये त्याने भन्नाट ऑफर्सही दिल्या आहेत. (Actor Sonu Sood Opened His Supermarket Gave An Offer To Support Small Business)

सोनूच्या सुपरमार्केटमधील ऑफर पाहून तुम्हीही चकित व्हाल. खरं तर सोनू एका सायकलवर बसला आहे, ज्यामध्ये सर्व उपयुक्त गोष्टी आहेत. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फ्री होम डिलिव्हरी आहे आणि १० अंड्यांसोबत एक ब्रेड मोफत मिळत आहे.

सोनूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो सायकलवर बसलेला दिसत आहे. या व्हिडिओत तो म्हणतो की, “कोण म्हणतंय मॉल बंद आहेत, सर्वात जास्त महत्त्वाचं आणि महागडी सुपरमार्केट तयार आहे. हे पाहा सर्वकाही आहे माझ्याकडे. अंडे आहे जे सध्या ६ रुपयांचे आहे, मोठे ब्रेड आहे, जे ४० रुपयांचे आहे. छोटे ब्रेड २२ रुपयांचे आहे. पाव आहे, रस्क आहे, काही बिस्किटही आहेत. ज्याला हवं आहे, त्याने यावं. लवकरात लवकर मला ऑर्डर द्या. आता माझ्या डिलिव्हरीचा वेळ झाला आहे. हो… डिलिव्हरीचे अधिक रुपये चार्ज आहेत. भेटूया बॉस. सोनू सूदचे सुपरमार्केट एकदम हिट आहे बॉस.”

आपल्या या व्हिडिओसोबत सोनूने हॅशटॅगही शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने हा व्हिडिओ का बनवला, हे स्पष्ट होते. खरं तर या व्हिडिओसह सोनूने #SupportSmallBusiness म्हणजेच लहान व्यावसायांना प्रोत्साहित करण्याबाबत बोलत आहे. यापूर्वीही ‘सोनू सूदचे लिंबू पाणी’ आणि ‘सोनू सूदचा ढाबा’ यांसारखे प्रयत्न त्याने केले आहे.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘पृथ्वीराज’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, आशुतोष राणा, मानुषी छिल्लर, यांसारखे अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष


Leave A Reply

Your email address will not be published.