आलिया भट्टच्या बोल्ड फोटोने लावली इंटरनेटवर आग; चाहतेही झाले इम्प्रेस


हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री सध्या त्यांच्या बोल्डनेसमुळे खूप चर्चेत आहेत. याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. ती अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलियाने तिच्या चाहत्यांना सरप्राईझ देत एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये आलिया सिझलिंग अंदाजात दिसत आहे. आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले हे फोटो इंटनेटवर आग लावत आहेत. तिचा हा अंदाज पाहून तिचे चाहते खूपच इम्प्रेस झाले आहेत. (Actress Alia Bhatt’s bold photo viral on social media)

आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटोशूट डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडर 2021 मधील आहे. यामध्ये आलियाचा लूक खूपच क्लासी दिसत आहे. या ड्रेससोबत तिने अगदी थोडीशी ज्वेलरी घातली आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते जबरदस्त प्रतिसाद देताना दिसत आहेत.

हे फोटो शेअर करून तिने कोणतेही कॅप्शन दिलेली नाही. तिने केवळ आईस क्यूबची ईमोजी पोस्ट केली आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहे. एवढंच काय तर अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. डब्बू रत्नानी कॅलेंडर 2021मध्ये सनी लिओनी आणि कियारा आडवाणी या अभिनेत्रींनीही टॉपलेस फोटोशूट केले होते.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे. या एकाच चित्रपटाने तिला खूप वेगळी ओळख मिळाली.

यानंतर तिने ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘हाय वे’, ‘गिल्ली बॉय’, ‘कलंक’, ‘राजी’, ‘शानदार’, :कपूर एंड सन’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती ‘आरआरआर’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.