Saturday, June 22, 2024

आम्रपाली अन् आकांक्षा दुबेने ‘पेट के नीचे साडी’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय

भोजपुरी अभिनेत्री हल्ली मोठ्या पडद्याव्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्या आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) आणि आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) या दोन्ही अभिनेत्रींचा समावेश आहे. या दोघी नेहमी आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असतात. अशातच आता आकांक्षाने इंस्टाग्रामवर आपला आणि आम्रपालीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही अभिनेत्री भोजपुरी गाणे ‘पेट के नीचे साडी’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत असून हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर, आकांक्षा दुबे आणि आम्रपाली दुबे सध्या त्यांच्या आगामी भोजपुरी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. दरम्यान, या दोघींनी स्वतःचा एक रील व्हिडिओ शूट केला आहे, ज्यामध्ये दोघेही भोजपुरी गाणे ‘पेट के निचे साडी’ (पहिर के पेट के निचे साडी)वर उत्कृष्ट मूव्हज दाखवताना दिसत आहेत. (Actress Amrapali Dubey Akanksha Dubey Dance On Bhojpuri Song Pahir Ke Pet Ke Niche Saari Viral Video)

व्हिडिओमध्ये आम्रपाली दुबे साडीमध्ये दिसत आहे, तर आकांक्षा देखील जीन्स आणि टॉपमध्ये कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये दोघीही जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. आतापर्यंत त्यांच्या व्हिडिओला ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने आम्रपाली दुबेला टॅग केले आहे. त्यांच्या डान्स व्हिडिओंवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत. दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. एकाने लिहिले, “तुला काय कळणार?” तसेच, दुसर्‍याने लिहिले की, “कमाल दिसत आहेस.”

‘पहिर के पेट के निचे साडी’ या भोजपुरी गाण्याच्या मूळ व्हिडिओबद्दल बोलायचे झाले, तर ते आम्रपाली आणि संभावना सेठ यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या व्हिडिओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘लागल रहा बताशा’ या चित्रपटातील हे गाणे आहे. या गाण्याला ओम झा यांनी संगीत दिले आहे, तर लिरिक्स आझाद सिंगने लिहिले आहे. गाण्याचे प्रोड्युसर संजीव कुशवाहा आणि आलोक सिंग आहेत. या गाण्याची निर्मिती व्ही क्लासिक म्युझिक प्रोडक्शनखाली झाली आहे. कोरिओग्राफी रिक्की गुप्ता आणि महेश आचार्य यांनी केली आहे.

हे देखील वाचा