Tuesday, March 5, 2024

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या आईने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ; पाहा फोटो

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचे लग्न लावून दिले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले तर काहीनी त्यांचे कौतुक केले. आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता फडकेच्या आईने देखील दुसर लग्न केले आहे. अमृता फडके सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट शेअर करताना अमृता फडकेने (Amrita Phadke) लिहिले की, “आई…., अभिनंदन. 8.12.2023 तुझ्या नविन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा … उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा, सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतीये. आणि तेही तुझ्या 2nd inning च्या टप्प्यावर!

खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती. आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हत, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भवनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळालीये. मनानी खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झालीये. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी a big thank you.

आई, हया वयात, आणि हया टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप guts लागतात. त्यासाठी खरतर दोघांनाही hats off तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना.” अमृता फडकेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

कमेंट करताना एकाने लिहिले की ,”पोस्ट खरंच खूप छान लिहीली. आणि खरच साथ हवीच. त्याचबरोबर नविन नाती जोडली जाणं, म्हणजे एक सोहळाच असतो. तुम्हा सर्वांनाच पुढिल वाटचालीस खूप शुभेच्छा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, :”पुढील प्रवास त्यांच्या मना प्रमाणे होवो” तर अनेकांनी त्यांचे ‘अभिनंदन’ केले आहे. (Actress Amrita Phadke mother tied the knot for the second time)

आधिक वाचा-
40 वर्षांच्या कारकिर्दीत जॅकी श्रॉफने साकारल्या सर्व भूमिका; म्हणाले, ‘मला त्याची पर्वा नव्हती, मी…’
पहिल्या पत्नीसह इव्हेंटमध्ये पोहोचला आमिर खान, मुलगी आयराला मिळाला पुरस्कार

हे देखील वाचा