×

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत चालू आहे अप्पू-शशांकच्या लग्नाचा सोहळा, अप्पूच्या लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

मराठी टेलिव्हिजनवर या वर्षी अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. खास म्हणजे नवख्या वाटणाऱ्या या मालिकांनी अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. यातीलच एक मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. ती म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी.’ प्रत्येक मालिकेचा एक साचा असतो आणि निर्माते त्याच्या साच्यानुसार बहुतांश वेळा मालिका तयार करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मालिकेची नायिका ही त्याग करणारी, गुणी, सगळ्यांचा आदर करणारी, अगदी साधी दाखवली जाते. परंतु फक्त या गुण विशेषणच्या व्यक्ती चांगल्या नसून बाकी स्वभावाच्या व्यक्ती ही नायिका बनू शकतात हे या मालिकेने दाखवून दिले आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे, तर चेतन वडनेरे हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतील दोघांची पात्र देखील अगदी हटके आहेत. खरंतर ज्ञानदाने या आधी काही मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु मालिकेतील अप्पू या पात्राने तिला खास ओळख मिळवून दिली आहे. (Thipkyanchi rangoli serials are on track of Shashank and apurva’s wedding)

View this post on Instagram

A post shared by shpurva❤️🌍 (@apurva._shshank._adore)

अशातच मालिकेत अपूर्वा आणि शशांक यांचा लग्नसोहळा दाखवला आहे. अगदी थाटामाटात त्यांचे लग्न दाखवले जात आहे. खास गोष्ट म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील इतर कलाकार काही संगीतकार, गायक देखील त्यांचा लग्नाला हजेरी लावत आहेत. लग्नातील नटखट आणि चंचल अप्पूचा लग्नातील लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. अशातच या मालिकेचे १०० एपिसोड पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त मालिकेच्या सेटवर दणक्यात सेलिब्रेशन देखील झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by shpurva❤️🌍 (@apurva._shshank._adore)

मालिकेतील लग्नाचा ट्रॅक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अप्पू आणि शशांकची जोडी देखील सगळ्यांना खूप आवडत आहे.

हेही वाचा :

Latest Post