बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची आई आणि अभिनेत्री अनन्या पांडे हीची आजी स्नेहलता पांडे यांचे शनिवारी (१० जुलै) निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या. आजीचे निधन झाले तेव्हा अनन्या पांडे ही घरी नव्हती. ती कामानिमित्त बाहेर गेली होती. आजीच्या मृत्यूची बातमी समजताच ती घरी परतली. ती या सगळ्या परिस्थितीने ती खचून गेली आहे. आजीच्या मृत्यूनंतर ती पुरती तुटून गेली आहे. (Actress Ananya pandey felt so sad for her grandmother death)
अनन्या पांडेने महिला दिनानिमित्त शेवटची तिच्या आजीसोबत पोस्ट शेअर केली होती. हा फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “सुंदरता, ह्युमर आणि ग्रेसने परिपुर्ण असलेली माझी बॉस वूमन. माझ्या या बेस्ट वूमनकडून सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळ्या खूप खास आहात. जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं तुमच्या आत लपलेलं आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.” अनन्या ही तिच्या आजीच्या खूप जवळ होती.
आजीच्या निधनाने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चंकी पांडेचे अनेक मित्र त्यांच्या मुंबई येथील बांद्रा स्थित असलेल्या घरी गेले होते. पण अजून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
अनन्या पांडे ही लवकरच ‘लायगर’ या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार देवरकोंडा सोबत दिसणार आहे. ‘लायगर’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनन्या पांडेने ‘स्टूडेंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-