गोड बातमी! हरभजन सिंग अन् गीता बसरा यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; जोडप्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव


आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टींचा समावेश अदृश्यपणे मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परस्परपूरक म्हणून या दोन्ही क्षेत्रांकडे पाहिले जाते. मात्र सध्या मनोरंजन विश्वात काही दिवसांपासून खूपच वाईट घटना घडताना दिसत आहे. असे असूनही दुसरीकडे अनेक चांगल्या बातम्या देखील ऐकायला येत आहे. क्रिकेट आणि मनोरंजन या दोन्ही क्षेत्रांसाठी एका अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.

क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता बसरा या दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याने प्रवेश केला आहे. दुसऱ्यांदा आई होत, गीताने एका मुलाला जन्म दिला आहे. हरभजन आणि गीता यांना आधी एक मुलगीही आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन हरभजनने मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे.

हरभजनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आम्ही देवाला खूप धन्यवाद करतो की, आम्हाला एक स्वस्थ आणि निरोगी मुलाच्या रुपात अनेक आशीर्वाद दिले. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही सर्व अत्यंत आनंदी असून, आमच्या सर्व शुभचिंतकाचे आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मी आभार मानतो.” हरभजनच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर क्रिकेट आणि मनोरंजनसृष्टीतील लोकांसोबतच फॅन्सने देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तत्पूर्वी गीता आणि हरभजन यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न केले. २०१६ मध्ये त्यांना एक मुलगी झाली आहे. तिचे नाव त्यांनी हिनाया असे ठेवले आहे. हरभजनने गीताला ‘द ट्रेन’ या सिनेमातील ‘वो अजनबी’ गाण्यात पाहिले आणि त्याला ती पाहताक्षणीच आवडली. त्यानंतर त्याने युवराज सिंगच्या मदतीने तिचा नंबर मिळवला आणि त्यांची भेट झाली. त्यानंतर पुढे भेटी वाढून मैत्री आणि मग प्रेम. असा प्रवास करणाऱ्या यांच्या या नात्यातला आज पूर्णत्व प्राप्त झाले आहे.

उजव्या हाताचा वेगवान मध्यमगती गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभजनच्या नावे क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डस् आहेत. १०० पेक्षा अधिक कसोटी आणि २०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या हरभजनच्या नावावर कसोटीमध्ये एकूण ४१७ विकेट्स आहेत. तर २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये २५ विकेट्स नावावर आहे. लवकरच तो ‘फ्रेन्डशिप’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर गीताने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. सध्या गीता काही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.