कुटूंब-मित्रांना तिचे मॉर्फ्ड केलेले अश्लील फोटो पाठवून, अज्ञात लोकं प्रत्युषा पॉलला देत आहेत बलात्काराच्या धमक्या


आपल्याला नेहमीच या ग्लॅमर जगात काम करणाऱ्या कलाकारांबद्दल हेवा वाटत असतो. त्यांना मिळणार पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता, त्यांचे आलिशान जीवन आदी अनेक गोष्टींना आपण भुलतो. मात्र असे असूनही नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात, हे विसरून आपल्याला चालणार नाही. वरवर दिसणाऱ्या अनेक बाबींची भुरळ आपल्याला पडते, मात्र कलाकारांना देखील अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते.

बंगाली टेलिव्हिजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्यूषा पॉलला एका अतिशय वाईट घटनेचा सामना करावा लागत आहे. प्रत्यूषाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही अज्ञात लोकांनी बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत. या घटनेमुळे हादरून गेलेल्या प्रत्यूषाने पोलिसात धाव घेत, या अज्ञात लोकांविरोधात बलात्काराची आणि अश्लील वेबसाईटवर मॉर्फ्ड फोटो अपलोड करण्याची तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी तिची तक्रार साइबर सुरक्षा विभाग मध्ये नोंदवली असून, याचा तपास त्यांनी सुरु केला आहे. अजून या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

या संपूर्ण घटनेबद्दल सांगताना प्रत्यूषाने सांगितले की, “माझ्यासोबत हे सर्व मागील एक वर्षांपासून होत आहे. सुरुवातीच्या काळात मी याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता प्रकरण हाताबाहेर जात आहे. मी अशा लोकांना माझ्या सोशल मीडियावरून ब्लॉक देखील केले. मात्र ते लोकं नवनवीन अकाऊंट तयार करून मला अशा धमक्या देत आहे. सोबतच या लोकांनी माझे मॉर्फ्ड केलेले फोटो अश्लील वेबसाइट्सवर टाकून, माझ्या आईला आणि मित्रांनासुद्धा पाठवले आहे. म्हणूनच मी पोलिसांकडे याविरोधात तक्रार नोंदवली आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.