स्विमिंग पूलमध्ये अंकिता लोखंडेने मलायका अरोराची पोज केली कॉपी; पाहा भन्नाट फोटो आणि व्हिडिओ


अंकिता लोखंडे आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत खास पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करत आहे. अंकिता सध्या विक्कीसोबत शिमला येथे आहे. तिथे ती एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिताच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

अंकिता लोखंडेचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना पाहून तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा एका क्षणासाठी नक्कीच आठवेल. वास्तविक, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अंकिताचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंकिता स्विमिंग पूलमध्ये विविध प्रकारचे पोझ देताना दिसली. या व्हिडिओमध्ये ती मलायका अरोराच्या गोव्याचे फोटोशूट पूर्णपणे कॉपी करताना दिसत आहे. तसेच, अंकिताच्या या फोटो आणि व्हिडिओचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

अंकिता लोखंडे हिने ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते. या शोमध्ये अंकिता आणि सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेत होते. ‘पवित्र रिश्ता’शिवाय अंकिता ‘एक थी नायक’ आणि ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

गेल्या वर्षी अंकिता लोखंडेने कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘बागी 3’ मध्ये देखील काम केले आहे. अंकिता लोखंडे ‘झलक दिखला जा’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या टीव्ही रियलिटी शोमध्यही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.