अंकिता लोखंडे घेणार ‘बिग बॉस १५’ मध्ये भाग? वेग धरलेल्या अफवांवर अभिनेत्रीने लावला पूर्णविराम


टीव्हीवरील सर्वात चर्चित, लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ या शोला ओळखले जाते. दरवर्षी टीव्हीवरच्या कलाकारांसह हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यावर्षी या शोचा १५ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, यावर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. यात अभिनेत्री अंकिता लोखंडेचेही नाव बऱ्याच दिवसांपासून घेतले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभाग घेणार आहे.

नुकतंच अंकिताने ‘बिग बॉस १५’ शोच्या पुढील सीझनमध्ये भाग घेण्याविषयीच्या सर्व अफवांना शांत केले आहे. या खोट्या बातमीसाठी लोकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली असल्याचे तिने सांगितले आहे. अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सांगितले आहे, की तिच्याबद्दलच्या ‘बिग बॉस १५’ मध्ये सामील होण्याच्या सर्व बातम्या निराधार आहेत.

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला असे कळले आहे की, काही मीडिया हाऊस म्हणत आहेत, मी यावर्षी बिग बॉसमध्ये भाग घेईन. मी या सर्वांना सांगू इच्छिते की, या शोमध्ये मी भाग घेत नाहीये याची त्यांनी नोंद घ्यावी. शोमध्ये सहभागी होण्याच्या सर्व बातम्या निराधार आहेत. लोकांनी मला त्या गोष्टीसाठी द्वेष पाठवायला इतकी घाई केली, ज्याचा मी भाग नाहीये.” असे म्हणत तिने तिच्याबद्दलच्या अफवांवर पूर्णविराम लावल्याचे पाहायला मिळाले.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर अंकिता बराच काळ सोशल मीडियापासून दूर राहिली. तिच्या कामाबद्दल बोलायचे म्हटले, तर अंकिताने झी टीव्हीवरील ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेत ‘अर्चना’ची भूमिका साकारून बरीच प्रसिद्धी मिळवली. २०१९ मध्ये अंकिताने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटातून केली. त्यानंतर ती २०२० मध्ये आलेल्या ‘बागी ३’ मध्ये दिसली होती, ज्याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

-‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच

-‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.