Sunday, June 23, 2024

धक्कादायक! अभिनेत्री अन्नपूर्णाने केली ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार दाखल, पण का?

मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर झळकणारे कलाकार किती सुखी आयुष्य जगत असतात, असा विचार कधीतरी प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मात्र, अशावेळी आपण चुकीचेही ठरू शकतो. कारण, सगळेच कलाकार हे सुखी नसतात. अनेकांच्या मागे दु:खाचे सावट असतेच. आता असेच काहीसे मराठी अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठलसोबत घडले आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ यामध्ये सूर्याच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल भलतीच चर्चेत आली आहे. तिने मालिकेचे दिग्दर्शक आणि सहकलाकारांवर मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. (Actress Annapurna Vitthal Filed A Complaint Against The Director of Sahkutumb Sahparivar)

माध्यमांतील वृत्तांनुसार, २२ नोव्हेंबर रोजी अन्नपूर्णाने त्यांच्याविरुद्ध दादर पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार नोंदवली होती. सोबतच तिने आपल्यासोबत घडलेलं सर्वकाही युट्यूब चॅनेलवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये तिने शोच्या सेटपासून ते आपल्या अनुभवापर्यंत सर्वांबद्दल सांगितले आहे. यादरम्यान बोलताना तिला अश्रू अनावर झाले. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ६६ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अन्नपूर्णाने केली दिग्दर्शक आणि सहकलाकारांबाबत तक्रार दाखल
अन्नपूर्णाने तक्रारीत म्हटले आहे की, “या मालिकेतील दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी माझा मानसिक छळ केला आहे.” त्याचवेळी तिने असेही सांगितले की, सेटवर तिचा इतका छळ झाला की, ती डिप्रेशनमध्ये गेली.

अन्नपूर्णाबाबत बोलायचं झालं, तर ती मूळची दक्षिण भारतातील आहे. ती गेली २५ वर्षे टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे.

अन्नपूर्णा मागील एक वर्षापासून करत होती शोमध्ये काम
अन्नपूर्णा जवळपास वर्षभरापासून शोमध्ये काम करत आहे. याशिवाय तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या शोचे दिग्दर्शन भरत गायकवाड करत आहेत, ज्यांनी त्यांच्या सहकलाकारांसह तिचा छळ केला होता. अभिनेत्रीने सांगितले की, या लोकांनी तिच्याशी जाणूनबुजून गैरवर्तन केले, त्यामुळे तिने शो सोडला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुणेकर चाहत्यांसोबत कल्ला करताना दिसली निया शर्मा, व्हिडिओ पाहून तुमचाही वाढेल उत्साह

-पारदर्शी ब्रालेट आणि लांब कोट घातलेल्या नेहा कक्करचा पॅरिसच्या रस्त्यांवर दिसला कातिलाना अंदाज

-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

हे देखील वाचा