नव्वदच्या दशकात रिलीज झालेला ‘आशिकी‘ हा सिनेमा आजही कदाचित सिनेरसिकांच्या मनात जसाच्या तसाच आहे. या सिनेमातून अभिनेत्री अनु अगरवाल एका रात्रीत स्टार झाली होती. ती आजही चाहत्यांमध्ये तेवढीच प्रसिद्ध आहे. मात्र, तिने स्टार बनल्यानंतर काही वर्षांतच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाने अनेकांना धक्का दिला होता. आता नुकत्याच एका मुलाखतीत तिने प्रेमाविषयी भाष्य केले आहे.
चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणाऱ्या अनु अगरवाल (Anu Aggarwal) हिने मुलाखतीत सांगितले की, ती तिच्या आयुष्यात नेहमीच मोकळ्या विचाराची राहिली आहे. तसेच, प्रेमाकडे ती वेगळ्या दृष्टीने पाहते. माध्यमांशी बोलताना अभिनेत्रीने म्हटले की, “माझ्या प्रेमाला काय झाले? मी खूपच मोकळ्या विचारांची मुलगी आहे. मी नेहमीच एक मोकळेपणाने वागणारी व्यक्ती राहिली आहे. प्रेमाबद्दल बोलायचं झालं, तर पुढे काय होणार, भविष्यात काय लिहिलं आहे, याची कल्पना कुणालाही नसते.”
प्रेम आणि इंटीमसी वेगळी
अभिनेत्री अनुचा 1999मध्ये एक कार अपघात झाला होता. यानंतर ती 29 दिवस कोमामध्ये होती. अनु सध्या एक मानसिक आरोग्य फाऊंडेशन चालवते. मुलाखतीदरम्यान अनु म्हणाली की, “माझ्या लैंगिक गरजा फार पूर्वीच संपल्या आहेत. मला या मुलांकडून (एनजीओच्या) खूप प्रेम मिळाले आहे. हे सर्व पवित्र आणि निष्पाप प्रेम आहे. माझ्या आयुष्यात प्रेमाची गरज खूप पूर्वीच पूर्ण झाली आहे. हे शारीरिक संबंधांबद्दल नाहीये. ते तर केव्हाच संपले होते. ते प्रेम नाहीये. प्रेमाची व्याख्या बदलली आहे. प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमधूनही मिळते. माझ्यासाठी प्रेम आणि सेक्स या एकसारख्या गोष्टी नाहीत.”
View this post on Instagram
इंडियन आयडल वाद
अनु अगरवाल काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल (Indian Idol) शोमध्ये झळकली होती. यानंतर तिने तक्रार केली होती की, शोमधील तिचे सीन्स कट केले आहेत. यामुळे चांगलाच वाद झाला होता. अनुने निर्मात्यांवर आरोप लावत म्हटले होते की, “मी स्टेजवर गेले आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही कृतज्ञता होती. मी देवाबद्दल विचार करत होते. कुमार सानूने टाळ्या वाजवल्या, सर्वजण उभे राहिले आणि टाळ्या वाजवल्या. हे सर्व डिलीट करण्यात आले. मला बचावात्मक भूमिका घ्यायची नाहीये. यासाठी मी चॅनेलला दोष देऊ इच्छित नाही. मी स्वत:च्या पायावर उभी झालेली मुलगी आहे.”
अनु अगरवाल हिच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘आशिकी’ या सिनेमाव्यतिरिक्त ‘खलनायका’, ‘किंग अंकल’, ‘गजब तमाशा’, ‘जनम कुंडली’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थिफ’, ‘राम शास्त्र’, ‘सनम हरजाई’, ‘अन्वेशी’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे. (actress anu aggarwal opens up about love says she doesnt equate it with sex)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! ‘पठाण’वर कमेंट करताच दिग्दर्शक अडचणीत, नेटकऱ्यांकडून मुलीचे ‘भगव्या’ बिकिनीतले फोटो व्हायरल
स्वत:च्या बहिणीशीच मलायकाने केले कडाक्याचे भांडण; भावूक होऊन म्हणाली, ‘जेव्हा गरज होती तेव्हा तू…’