Tuesday, May 21, 2024

पुन्हा वादात अडकला ‘इंडियन आयडल 13’ शो, आता तर ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीनेच लावलेत गंभीर आरोप

आशिकी‘ या सिनेमातून एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे अनु अगरवाल होय. अनु ही दिवसेंदिवस या ना त्या कारणामुळे माध्यमांमध्ये झळकताना दिसत असते. यावेळी तिचे चर्चेत येण्यामागील कारण ‘इंडियन आयडल 13’ आहे. रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल 13’च्या निर्मात्यांनी अनुला दुखावल्याचे तिने म्हटले आहे. मागील आठवड्यात शोमध्ये ‘आशिकी स्पेशल एपिसोड’ झाला होता, ज्यामध्ये सिनेमाची संपूर्ण स्टार कास्टने हजेरी लावली होती. यामध्ये राहुल रॉय, दीपक तिजोरी, कुमार सानू यांचा समावेश होता. यामध्ये अनुदेखील होती, पण तिला शोमध्ये कमी स्क्रीन स्पेस देण्यात आला. त्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री अनु अगरवाल (Anu Aggarwal) हिने माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले. तिने ‘इंडियन आयडल 13’च्या (Indian Idol 13) निर्मात्यांवर आरोप लावला आहे की, त्यांनी अनुचे सीन्स कट केले आहेत. कारण, ती शोमध्ये राहुल रॉय (Rahul Roy) आणि दीपक तिजोरी (Deepak Tijori) यांच्या शेजारीच बसली होती. मात्र, ती शोमधून गायब होती. या गोष्टीने तिला नाराज केले आहे. मात्र, तिने हेदेखील म्हटले की, ती या गोष्टीचा मुद्दा बनवणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anu Aggarwal (@anusualanu)

निर्मात्यांनी कापले अनु अगरवालचे सीन्स?
सिनेविश्वाला राम राम ठोकणाऱ्या अनु अगरवाल हिने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी शोमध्ये काही प्रेरणादायी गोष्टी बोलले, पण हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला नाही. यामुळे मी दु:खी आहे.” अभिनेत्रीने हेही म्हटले की, शोशी संबंधित लोकांवर तिचे प्रेम आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती स्टेजवर आली, तेव्हा सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या, परंतु शोमध्ये हे दाखवले गेले नाही.

यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकलाय ‘इंडियन आयडल 13’ शो
‘इंडियन आयडल’ शोच्या 13व्या पर्वात नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी परीक्षक आहेत. हा शो आणखी एका कारणामुळे वादात अडकला होता. ते म्हणजे स्पर्धक रिटो रिबा (Rito Riba) याला न निवडून. अरुणाचल प्रदेशच्या रिटोला या स्पर्धेत निवडले गेले नव्हते. रिटोचा आवाज इतका चांगला होता की, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. तसेच, शोला बॉयकॉट करण्याचीही चर्चा सुरू झाली होती. यावेळी शोच्या निर्मात्यांपासून ते परीक्षकांपर्यंत सर्वांवर टीका झाली होती. (Indian Idol 13 in controversies aashiqui fame actress Anu Aggarwal serious allegations on makers)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
आमिर खानची लेक आयरा बसली बॉयफ्रेंडच्या कुशीत, दोघांचेही रोमँटिक फोटो सर्वत्र व्हायरल
एक्स बॉयफ्रेंडच्या कॉन्सर्टमधील केंडल जेनरचा ‘तो’ व्हिडिओ पाहाच, सर्वत्र होतोय व्हायरल

हे देखील वाचा