हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांनाच वेड लावले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी यशस्वी चित्रपट काढत चांगले नाव कमावले होते. मात्र यशाच्या शिखरावर जाऊन अचानक त्यांनी हे क्षेत्र कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे प्रत्येकाला आश्चर्य वाटले होते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
अर्चना जोगळेकर (Archana Joglekar) ही हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या काळातील ‘कर्मभूमी’, ‘फूलवती’ आणि ‘किस्सा शांती का’ हे चित्रपट प्रचंड गाजले. अर्चनाला केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही, तर तिच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यामुळेही ओळख मिळाली आहे. अर्चना जोगळेकर यांनी हिंदीसह मराठी चित्रपटातही भरपूर काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चनाने त्यांची आई आशा जोगळेकर यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले आहे. अर्चनाची आई देखील मुंबईत एक डान्स स्कूल चालवते, ज्याचे नाव तिने आपल्या मुलीच्या नावावर अर्चना नृत्यालय ठेवले आहे.
त्या काळात चित्रपट जगतात प्रसिद्ध असलेल्या अर्चनाच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली होती. ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९९७मध्ये एका ओरिसा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अर्चनासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना त्यावेळी खूप चर्चेत आली होती आणि त्यावरून बराच गदारोळही झाला होता. बातमीनुसार, या घटनेत अर्चना थोडक्यात बचावली होती. त्यावेळी, ज्या व्यक्तीने अभिनेत्रीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याला २०१०मध्ये अटक करण्यात आली आणि १८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याचबरोबर अर्चना त्यांच्या चित्रपट क्षेत्राला सोडण्याच्या निर्णयामुळेही चर्चेत आल्या होत्या. करिअरच्या शिखरावर असताना अर्चनाने अचानक चित्रपटसृष्टीला अलविदा केला. ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या १९९९ पासून अमेरिकेत स्वतःची नृत्य शाळा चालवतात आणि लोकांना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देतात. करिअरच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टी सोडून लग्न करण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना अर्चना एकदा म्हणाल्या होत्या, “नृत्य माझ्यासाठी ऑक्सिजनसारखे आहे, मला ती योग्य व्यक्ती योग्य वेळी सापडली होती, ज्याच्यासोबत मी फक्त नाही. माझी स्वप्ने शेअर करायचे होते आणि कुटुंब वाढवायचे होते, पण त्याने माझी आवड समजून घेतली आणि त्याला पाठिंबा दिला.” मात्र आजही अर्चना यांच्या चित्रपटांचे आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जाते.
हेही वाचा –










