×

तब्बल ३२ वर्षांनंतर, अरुणा इराणी यांचा गौप्यस्फोट; पतीबद्दल केला धक्कादायक खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक वर्ष या क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या अभिनेत्रींमध्ये अरुणा इराणी (Aruna Irani) यांचे नाव देखील प्रामुख्याने घेतले जाते. नुकतेच अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल.

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात जेष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अरुणा इराणी यांचे नाव घेतले जाते. अरुणा यांनी तब्बल पाच दशके हिंदी चित्रपट जगतात काम केले आहे. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अरुणा इराणी यांनी लग्नाच्या बत्तीस वर्षानंतर पती कुकू कोहली यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी नुकतेच एका मुलाखतीत आपले अनेक अनुभव आणि वैवाहिक आयुष्याबद्दल मजेशीर किस्से सांगितले होते. यावेळी त्या म्हणतात की, “आमच्या नात्याची सुरुवात सेटवरील भांडणापासून झाली. मात्र हेच नाते पुढे प्रेमात बदलले. चित्रपटावेळी ते सगळ्यांना धर्मेंद्र येईपर्यंत थांबवायचे, त्यामुळे मला खूप राग यायचा. कारण मी त्यावेळी आणखीही काही चित्रपटात काम करत होते. मात्र ते मला खूप धीर द्यायचे.”

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

याबद्दल पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “जेव्हा मी कुकू कोहलीला भेटले ते पहिल्यापासून विवाहित होते. मात्र माझ्यापासून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली त्यामुळे मी सुद्धा आमच्या नात्याला पुढे घेऊन गेले.”

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

त्यांच्या आणि मेहमूद यांच्या नात्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, “‘कारवां’ चित्रपटानंतर मला कोणतेही काम मिळाले नाही. ‘बॉम्बे टु गोवा’ हा चित्रपटसुद्धा यशस्वी ठरला. मात्र याच काळात काही लोकांचा असा गैरसमज झाला की मी मेहमूदसोबत लग्न केले आहे. यावेळी मीसुद्धा कोणाला सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मला काम मिळाले नाही. सुदैवाने मला त्यावेळी राज कपूर यांचा फोन आला आणि त्यांनी मला ‘बॉबी’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर मला पुन्हा एकदा चित्रपट मिळायला लागले आणि मी यशाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. मी येईल ती भूमिका निभावत गेले.”

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

यावर त्यांनी शेवटी हसत हसत, “मेहमूदमुळेच मी यशस्वी झाले. त्यांनीच माझे करिअर बनवले आणि बिघडवले. मात्र त्यांच्याकडून मी खूप काही शिकले.” असे प्रामाणिक मत व्यक्त केले होते. अभिनेत्री अरुणा इराणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post