×

प्रेग्नेंट असल्यामुळे अनेक निर्मात्यांनी नेहा धुपियाला दिला होता डच्चू! अभिनेत्रीने ऐकवली व्यथा

नेहा धुपिया (Dhupia) म्हणते की तिला गरोदरपणात काम करायचे होते. कारण ब्रेक घेण्याच्या आणि नंतर परत येण्याच्या प्रयत्नात इतक्या अडचणी येतात की तिला त्यामधून जायचे नव्हते. अभिनेत्री म्हणते की, जर तिने चित्रपट निर्मात्यांना तिची भूमिका प्रेग्नंट स्त्री म्हणून दाखविण्यास प्रवृत्त केले, तर ही इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन करण्याची सुरुवात असेल.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

उदाहरण बनून आली समोर
नेहा धुपिया इंडस्ट्रीत काहीतरी नवीन करण्याचे उदाहरण बनली आहे. तिच्या लेटेस्ट चित्रपट ‘ए थर्सडे’मध्ये ती गर्भवती पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेहा पाच महिन्यांची गर्भवती होती, जेव्हा तिने चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, चित्रपट निर्मात्यांनी सुरुवातीला तिला कथेत गर्भवती पोलीस म्हणून कास्ट केले नव्हते. परंतु जेव्हा त्यांना ही बातमी सांगण्यात आली, तेव्हा तिची गर्भधारणा हळूहळू पडद्यावरच्या तिच्या भूमिकेचा एक नवीन भाग बनली. (neha dhupias big disclosure on body shaming extracted from many films due to pregnancy)

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

करायचं होतं ‘हे’ काम
नेहा धुपिया म्हणाली की, गरोदर असणं आणि चित्रपटात स्वत:ची भूमिका साकारणं खूप रोमांचक होतं। कारण तिला तिथं स्वत:ला बाहेर ठेवायचं होतं आणि तिची कमकुवत बाजू आणि अशा इतर महिला आणि चित्रपट निर्मात्यांना ठळकपणे दाखवायचं होतं. तिला गर्भवतींसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी प्रेरित करायचे होते.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

असा मिळाला ‘ए थर्सडे’
‘ए थर्सडे’ चित्रपट मिळवण्याच्या तिच्या प्रवासाबद्दल तपशीलवार सांगताना ती म्हणाला, “दुसऱ्या लाटेत (कोविड-१९) मी सर्व प्रकल्प गमावले. हा खरोखर माझा शेवटचा प्रयत्न होता. मी थकून खाली बसले आणि मग त्यांना सांगितले की, मी पाच महिन्यांची गरोदर आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मला ठेवू इच्छिता की माझी जागा बदलू इच्छिता? ही तुमची निवड आणि तुमचा चित्रपट आहे. तेव्हा ते म्हणाले, आम्ही तुम्हाला बदलू इच्छित नाही.”

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा आता दोन मुलांची आई आहे. तिने सांगितले की, तिला इंडस्ट्रीत सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे आणि तिला तिच्या पदाचा उपयोग करून घ्यायचा आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post