×

नीलपरीच जणू! शिल्पा शेट्टीच्या निळसर सौंदर्याने चुकवला चाहत्यांच्या हृदयाचा ठोका, एक नजर टाकाच

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियावरही सतत चर्चेत असते. यावरून ती तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आता शिल्पाच्या आणखी एका सुंदर फोटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या फोटोमध्ये शिल्पा खूपच मनमोहक दिसत आहे.

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ९०च्या दशकात आपल्या तिने अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले होते. सध्या शिल्पा चित्रपटात जास्त दिसत नसली, तरी अनेक टीव्ही शोमध्ये दिसत असते. शिल्पाच्या फिटनेसची चर्चा तर आजही पाहायला मिळते. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या शिल्पाच्या एका व्हायरल फोटोने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. यामधील शिल्पाचा लूक पाहुन सगळेच तिचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

हा व्हायरल फोटो शिल्पाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा वनपीस गाउन घातला आहे. शिल्पा या गाउनमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे. त्यामुळेच तिचे चाहते तिच्या या फोटोवर फिदा झाले आहेत. शिल्पाच्या या व्हायरल फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. हलकासा मेकअप आणि स्टायलिश पोझमुळे शिल्पाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. शिल्पाच्या या व्हायरल फोटोवर तिच्या चाहत्यांनी ‘निल परी’ तर काही जणांनी ‘परमसुंदरी’ अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा फोटो सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शिल्पा शेट्टी सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. कार्यक्रमात किरण खेर (Kirron Kher), बादशाह (Badshah) आणि शिल्पा शेट्टी यांच्या धमाल मस्तीने खूपच रंगत येत आहे. शिल्पाचे या कार्यक्रमाच्या सेटवरील अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. शिल्पाने हिंदी चित्रपट क्षेत्रात सलमान खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी अशा आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post