Thursday, June 13, 2024

‘टॅलेंटमुळे काम मिळालंय, सोशल मीडिया…’, अभिनय करिअरच्या संघर्षावर ‘आनंदी’चे परखड मत

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारणारी अभिनेत्री म्हणजे अविका गौर होय. अविकाने बालपणीच अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने 2007 साली ‘शशश…कोई है’ या हिंदी टीव्ही मालिकेतून पदार्पण केले होते. मात्र, तिला ‘बालिका वधू’ या मालिकेतील ‘आनंदी’ पात्राने घराघरात पोहोचवले. आज अविकाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एकीकडे जग सोशल मीडियाकडे धावत असताना, अविका त्यापासून स्वत:ला दूर ठेवते किंबहूना कमी सक्रिय असते. अविकाला इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ती इतर कलाकारांप्रमाणे लाखो फॉलोव्हर्स मिळवू शकली नाहीये. अशात नुकत्याच एका मुलाखतीत अविकाने म्हटले की, हा तिचा स्वत:चा निर्णय होता.

एका मुलाखतीत अविका गौरने सोशल मीडियाबद्दल (Avika Gor On Social Media) मत मांडले. अविका गौर (Avika Gor) म्हणाली की, “मी सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करते. मात्र, मला असे करण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही. मी नेहमी गोष्टी शेअर करत नाही, ज्या मला करायच्या नसतात. असेही दिवस येतात, जेव्हा मी जाणूनबुझून यातून पूर्णपणे ब्रेक घेते. कधी-कधी मी इतर गोष्टींमध्ये व्यस्त असते आणि सोशल मीडिया लक्ष विचलित करणारे असावे असे मला वाटत नाही.”

अविका म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून मी स्वत:वर जास्त दबाव टाकत नाही. कारण, मी शेअर केलेल्या पोस्टमुळे माझा कोणताही प्रोजेक्ट माझ्याकडे येत नाही. ते माझ्याकडे येतात, कारण ते एका अभिनेत्रीच्या रूपात माझ्या प्रतिभेवर विश्वास ठेवतात. जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहात, तर हे निश्चितरीत्या कठीण आहे.”

अविकाने तिचा नुकताच बॉलिवूड पदार्पण सिनेमा ‘1920: हॉरर्स ऑफ द हार्ट’विषयी चर्चा केली. ती म्हणाली की, “बॉलिवूडमध्ये माझ्या पदार्पणाचे कौतुक केले गेले आणि मी त्यामुळे खुश आहे. मी स्वत:ला मर्यादित ठेवत नाहीये, पण मी निश्चितरीत्या काही ओटीटी प्रोजेक्ट्सवर काम करू इच्छिते. मी महिला केंद्रित योजनांवर काम करण्यासाठी उत्सुक आहे आणि वास्तवात मला बऱ्याच रोमँटिक सिनेमात काम करायचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

अभिनेत्री पुढे असेही म्हणाली की, “आज लोक वेगळ्या कहाणीचे कौतुक करत आहेत. मला या पिढीचा भाग बनून आनंद होत आहे, ज्यांना फक्त टीव्हीमध्ये नाही, तर ओटीटी सिनेमे आणि थिएटरमध्येही प्रयोग करण्याची संधी मिळते. मी ज्या कोणत्या प्रोजेक्टची शूटिंग करत आहे, त्यासाठी उत्साहित आहे. मग ते माध्यम कुठलेही असो.”

अविकाविषयी बोलायचं झालं, तर तिने तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्येही काम केले आहे. तसेच, तिला पुढे गुजराती सिनेसृष्टीतही काम करायचे आहे. (actress avika gor talks about her career struggle know here)

महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! टिपू सुलतान यांच्यावर बनत असलेल्या सिनेमाचे काम बंद, धमक्यांमुळे निर्मात्याने उचलले मोठे पाऊल
‘स्वत:ला सर्वात स्मार्ट समजणे मोठी चूक’, पूजा भट्टला आजपर्यंत आहे ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, वाचा

हे देखील वाचा