Thursday, September 28, 2023

‘स्वत:ला सर्वात स्मार्ट समजणे मोठी चूक’, पूजा भट्टला आजपर्यंत आहे ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, वाचा

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. पूजाने स्टारकिड असण्याव्यतिरिक्त अभिनय आणि सिनेमे दिग्दर्शित केल्यामुळे चांगले नाव आणि पैसा कमावला आहे. मात्र, यश मिळवूनही पूजा भट्टला पश्चाताप आहे. ती बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली आहे. मात्र, तिने कधीकाळी असे निर्णय घेतले होते, ज्याचा पश्चाताप तिला आजही आहे.

‘स्वत:ला सर्वात हुशार समजणे मोठी चूक’
पूजा भट्ट (Pooja Bhatt) सध्या ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) शोमध्ये झळकत आहे. एका एपिसोडमध्ये तिने स्पर्धकांसोबत बोलताना आपल्या बॉलिवूड प्रवासाबद्दलही चर्चा केली. तिने यावेळी सांगितले की, तिला कोणकोणत्या गोष्टींचा पश्चाताप आहे.

पूजा म्हणाली की, “जर कुणी असा विचार करत असेल की, एका खोलीत तो सर्वात हुशार आहे, तर तो एका चुकीच्या खोलीत आला आहे. मला फक्त त्या गोष्टींचा पश्चाताप आहे, ज्या मी केल्या नाहीत. त्या गोष्टींचा नाही, ज्या मी केल्या आहेत. मला वाटते की, एकदा तरी काही करून पाहिले पाहिजे. एक तर तुम्ही गमावता किंवा सर्वकाही मिळवता.”

‘आपण जे आहोत, ते लवपू नाही शकत’
‘बिग बॉस’ स्पर्धक असण्याबाबत ती म्हणाली की, “आपण कोण आहोत, हे आपण लवपू शकत नाहीत. प्रेक्षकांना सर्वकाही समजते. आपल्या सर्वांपैकी कुणीतरी एक जिंकेल. प्रयत्न करणे आणि आपले चांगले करणे खूप गरजेचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

पूजा भट्टला मिळाली नॉमिनेशन प्रक्रियेची कमान
‘बिग बॉस’चा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये दिसते की, सर्व स्पर्धक सफरचंद खाऊन एकमेकांना नॉमिनेट करत आहेत. पूजा भट्टला खास अधिकार दिला गेला आहे, ज्याद्वारे ती ठरवू शकते की, कोण किती नॉमिनेशन करू शकतो. यादरम्यान बेबिका, अविनाश, अभिषेक आणि सर्वजण एकमेकांविरुद्ध एक घास घेऊन आपल्या मनातील गोष्टी सांगत आहेत.

पूजा भट्ट होणार बाहेर?
सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, पूजा भट्ट घराबाहेर होऊ शकते. ती वैद्यकीय कारणांमुळे मध्येच शो सोडून जाऊ शकते. (actress pooja bhatt opens up on her regrets in life in bigg boss ott 2 know here)

महत्त्वाच्या बातम्या-
बापरे बाप! मनोज वाजपेयी आहेत 170 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक? अभिनेत्याची रिऍक्शन वाचून व्हाल हैराण
कधीकाळी रस्त्यावर आणि रिक्षावर सिनेमाचे पोस्टर चिटकवायचा ‘हा’ चिमुकला, आज त्याच्यामुळेच हिट होतात सिनेमे

हे देखील वाचा