Tuesday, September 26, 2023

धक्कादायक! टिपू सुलतान यांच्यावर बनत असलेल्या सिनेमाचे काम बंद, धमक्यांमुळे निर्मात्याने उचलले मोठे पाऊल

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिनेनिर्माते संदीप सिंग यांनी सोमवारी (दि. 24 जुलै) मोठी घोषणा केली. त्यांनी घोषणा करत सांगितले की, ते म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्यावर बनवत असलेला सिनेमा बंद करत आहेत. त्यांनी हे पाऊल का उचलले, याचेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला टिपू सुलतान अनुयायांकडून धमक्या मिळत आहेत. संदीप सिंग यांनी ट्विटरद्वारे सिनेमा बंद करत असल्याची घोषणा केली.

काय म्हणाले संदीप सिंग?
संदीप सिंग (Sandeep Singh) यांनी ट्वीट करत म्हटले की, “हजरत टिपू सुलतान यांच्यावर सिनेमा बनणार नाही. मी माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती करतो की, त्यांनी माझे कुटुंब, मित्र आणि मला धमकी देण्याचे किंवा गैरवर्तन करण्याचे टाळावे. जर माझ्याकडून अनावधानाने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो. माझा असे करण्याचा कधीच विचार नव्हता. कारण, मी सर्वांचा सन्मान करण्यात विश्वास ठेवतो. भारतीयांच्या रूपात आपण एकजुटीने राहूया आणि नेहमी एकमेकांचा आदर करूया.”

केव्हा झाली होती घोषणा?
या सिनेमाची निर्मिती संदीप, इरॉस इंटरनॅशनल आणि रश्मी शर्मा फिल्म्स करणार होते. हा सिनेमा कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज केला जाणार होता. सिनेमाची घोषणा मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झाली होती. ज्यावेळी सिनेमाची घोषणा झाली होती, तेव्हा संदीप सिंग म्हणाले होते की, ते टिपू सुलतान यांची सत्यता जाणून हैराण झाले होते.

लोक नाराज का झाले?
ते म्हणाले होते की, “हा तो सिनेमा आहे, ज्यावर मी वैयक्तिकरीत्या विश्वास ठेवतो. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, अटल बिहारी असो किंवा बाल शिवाजी असो. माझे सिनेमे वास्तवावर आधारित आहेत. मला वाटते की, लोकांना माहिती होते की, टिपू सुलतान किती अत्याचारी होता, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले. हेच कारण आहे, जे मी 70 मिमी पडद्यावर प्रदर्शित करू इच्छितो. खरं तर, तो सुल्तान म्हणण्याच्याही लायकीचा नाहीये.”

“जसे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये दाखवण्यात आले आहे, त्याला एक शूर व्यक्ती मानण्यासाठी माझे डोके खराब केले होते. मात्र, त्याची द्वेषपूर्ण बाजू कुणालाही माहिती नाहीये. मी येणाऱ्या पिढीसाठी त्याची काळी बाजू समोर आणू इच्छितो.”

अशात संदीप सिंग यांनी टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्यावरील सिनेमा बंद केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत. (film on tipu sultan stopped making producer sandeep singh was getting constant threats know more)

महत्त्वाच्या बातम्या-
‘स्वत:ला सर्वात स्मार्ट समजणे मोठी चूक’, पूजा भट्टला आजपर्यंत आहे ‘या’ गोष्टीचा पश्चाताप, वाचा
बापरे बाप! मनोज वाजपेयी आहेत 170 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक? अभिनेत्याची रिऍक्शन वाचून व्हाल हैराण

हे देखील वाचा