Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आनंदाची बातमी! बिपाशाने फोटो शेअर करत एकदाचं सांगूनच टाकलं, पाहून तुम्हीही व्हाल खुश

बॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे जोडपे लवकरच आई-बाबा बनणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नुकतीच अशी बातमी समोर आली होती की, हे सेलिब्रिटी जोडपे लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या बातमीची पुष्टी करण्यासाठी आता बिपाशाने खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईल निवडली आहे.

बिपाशाच्या बेबी बंपवर किस करताना दिसला करण
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या मध्ये तिचा पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हा मॅचिंग पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. बिपाशाने परिधान केलेल्या मोठ्या शर्टची बटणे उघडली आहेत. तसेच, दुसऱ्या फोटोत तो तिच्या पत्नीच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे.

बिपाशाने लिहिली भावूक पोस्ट
हे फोटो शेअर करत बिपाशाने भावूक पोस्ट लिहिली. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आपल्या जीवनात आणखी एक अद्वितीय प्रतिमा जोडतो. आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक पूर्ण करते. आम्ही हे आयुष्य वैयक्तिकरीत्या सुरू केले आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हापासून आम्ही दोघेच होतो. फक्त दोघांसाठी खूप प्रेम, आम्हाला थोडं चुकीचं वाटत होतं… म्हणून लवकरच, जे आम्ही दोन होतो ते आता तीन होणार आहोत. आमच्या प्रेमातून निर्माण झालेली रचना, आमचे बाळ लवकरच आमच्यासोबत आमच्या आनंदात सामील होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) 

तसेच तिने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार. हे प्रेम नेहमीच आमचा एक भाग असेल. आमच्या आयुष्याचा एक भाग बनल्याबद्दल आणि आमच्या बाळाला, दुसर्‍या सुंदर जीवनासाठी आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. दुर्गा दुर्गा.”

लग्नाच्या ६ वर्षांनंतर बनणार आई
खरं तर, बिपाशा आणि करण यांच्या प्रेमाला एका सिनेमाच्या सेटवर सुरुवात झाली होती. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. त्यांचे लग्न बंगाली आणि पंजाबी रीतिरिवाजाने झाले होते. आता त्यांच्या लग्नाला ६ वर्षे उलटल्यानंतर हे जोडपे आई-वडील बनणार आहे. त्यामुळे ते खूपच खुश आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?
सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या मांजरेकरांनी उराशी बाळगलेलं ‘हे’ स्वप्न, पण अभिनयाने मिळवून दिली ओळख
बारा वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करणारा सैफ आहे ८०० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक, ताफ्यात आलिशान गाड्या

हे देखील वाचा