×

यशस्वी सर्जरी झाल्यानंतर छवी मित्तलने शेअर केली पोस्ट, म्हणाली ‘आता तर रिकव्हरीचा प्रवास बाकी’

अभिनेत्री आणि यूटुबर असणारी छवी मित्तल सध्या ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढा देत आहे. काही दिवसांपूर्वीच छवीने तिला कॅन्सर झाल्याची माहिती सर्वांना दिली. तिला व्यायाम करताना जखम झाली आणि त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली तर तिला अनेक टेस्ट केल्यानंतर कॅन्सर झाल्याचे निदान झाले. छवीने तिच्या प्रकृती संदर्भात प्रत्येक माहिती सोशल मीडियावर सर्वांसोबत शेअर केली. अतिशय सकारत्मक पद्धतीने छवीने तिच्या आजाराला घेतले आणि यातून ती नक्कीच बाहेर येणार असा विचार केला. आता नुकतीच छवीची सर्जरी झाली आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे.

छवी मित्तलने सर्जरी झाल्यानंतर तिचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “डॉक्टरांनी मला डोळे बंद करून काहीतरी चांगला विचार करायला सांगितला. मी माझ्या सुंदर आणि स्वस्थ ब्रेस्टचा विचार केला. त्यानंतर मला समजले की, मी कॅन्सर मुक्त झाली आहे. माझी सर्जरी सहा तास चालली. अनेक प्रक्रिया केल्या गेल्या. आता बरे होण्याचा प्रवास अजूनच मोठा आहे. मात्र सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे आता सर्व चांगले होणार आहे. जे वाईट होते ते निघून गेले.”

View this post on Instagram

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

पुढे छवी लिहिते, “तुमच्या प्रार्थनेची आणि साथीची मला आता सर्वात जास्त गरज आहे. कारण आता मी खूपच जास्त त्रासात आहे आणि हा त्रास मला आठवण करून देतो की, मी माझ्या चेहऱ्यावरील हास्यासह खूप मोठी लढाई जिंकली आहे. मी तुमच्यासोबत अजून अधिक माहिती नक्कीच शेअर करेन. मात्र माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करतच राहा शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझ्या नवऱ्याच्या साथीशिवाय काहीही करू शकली नसती. तो माझ्यासारखाच वेद, धीर असणारा आणि मजबूत आहे. मोहित मी तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू नाही पाहू शकत.”

View this post on Instagram

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

तत्पूर्वी छवीने तिच्या सर्जरी आधी तिचा एक डान्स करतानाच हॉस्पिटलमधला व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती सर्जरी आधी डान्स करत होती. छवीच्या या सकारात्मकतेने सोशल मीडियावर आणि तिच्या फॅन्समध्ये खूपच कौतुक होताना दिसत आहे.

हेही वाचा-

Latest Post