×

बॉलिवूड गायकांच्या आवाजाला टक्कर देतोय एका ट्रक ड्रायव्हरचा आवाज, पाहा हा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म बनले आहे, ज्यावर रोज काहीतरी व्हायरल होत असते. सोशल मीडियाने देशाला अनेक स्टार्स दिले आहेत. रानू मंडलपासून (Ranu Mandal) ते भुवन बड्याकर (Bhuban Badyakar) असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना सोशल मीडियाने ओळख दिली आहे. रानू मंडल आणि भुवन बड्याकर यांच्याप्रमाणेच आता एक ट्रक ड्रायव्हरही सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या ट्रक ड्रायव्हरचा आवाज लोकांच्या हृदयाला भिडणारा आहे. सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओमध्ये ट्रक चालक मोहम्मद रफींचे (Mohammad Rafi)गाणे गाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ विवेक वर्मा नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो आता चर्चेत आला आहे. व्हिडीओ शेअर करणारा विवेक वर्मा स्वतः गायक आहे आणि तरुणांमध्ये त्याला खूप पसंत केले जाते. व्हिडिओ शेअर करताना विवेकने दिलेले कॅप्शनही लोकांच्या हृदयाला भिडणारे आहे. ट्रक ड्रायव्हर काकांचा व्हिडिओ शेअर करताना विवेकने एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. यासोबतच ट्रक चालक काकांचे नावही सांगण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vivek Verma (@vvekverma)

विवेकने “मी तुम्हा सर्वांना कॅप्शन वाचण्याची विनंती करतो. कमलेश काका आयुष्यभर ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते एक उत्तम संगीतकार आणि मोहम्मद रफीचे मनापासून चाहते आहेत. तुम्हाला ते ऐकायला आवडले असेल, तर काही चांगल्या कमेंट शेअर करा. मी उद्या त्यांना भेटेन आणि त्यांचे सर्व प्रतिसाद वाचेन. आणि मी त्यांना म्युझिक स्टुडिओत नेण्याचा प्रयत्न करेन आणि इना स्टुडिओत गाण्याचे स्वप्न पूर्ण झाले तर जे लोक त्यांना थोडे जरी साथ देतील, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन. ही मार्केटिंग पोस्ट अजिबात नाही,” असे सांगत लोकांना व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post