Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भल्याभल्यांनी केले ट्रोल, पण दीपिका राहिली हिमालयासारखी उभी; फीफा विश्वचषकात उंचावली भारतीयांची मान

बेशरम रंग‘ या गाण्यामुळे देशभरातून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यावर टीकेची झोड उडाली आहे. या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले. तरीही ती न डगमगता हिमालयासारखी उभी राहिली. याच दीपिकाने रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतार येथे फीफा विश्वचषक 2022 स्पर्धेदरम्यान भारतीयांची मान उंचावली. तसेच, ट्रोलर्सची बोलती बंद केली. दीपिका फीफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय बनली. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच, नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. यादरम्यान तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले.

दीपिकाची ड्रेसिंग स्टाईल
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (Argentina vs France) सामन्यापूर्वी माजी स्पॅनिश गोलकीपर इकेर कासिलास याच्यासोबत फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) ट्रॉफीचे अनावरण केले. यादरम्यान दीपिकाने परिधान केलेला ड्रेस भलताच चर्चेत आहे. भारतात भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे ट्रोल होणारी दीपिका यादरम्यान काळ्या रंगाची सैल पँट आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली होती. यासोबतच तिने चॉकलेटी रंगाचा लेदर ओव्हरकोटसह आपला लूक परिपूर्ण केला होता. यामध्ये स्टेटमेंट बेल्टही होता.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दीपिका या लूकमध्ये गर्दीपेक्षा खूपच वेगळी दिसली. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य तिच्या सुंदरतेमध्ये चार चांद लावत होते. तिचा ड्रेस पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका ट्विटर युजरने दीपिकाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “भावांनो आणि भगिणींनो, दीपिकाने फीफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत रणवीर सिंगच्या जलाऊद्दीन खिलजी कवचमध्ये ट्रॉफीचे अनावरण केले.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “ओह माय गॉड राणी इथे आहे.”

एकाने असेही लिहिले की, “दीपिकाे फीफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले. भक्तांचा जळफळाट झाला असेल.”

याव्यतिरिक्त अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील दीपिकाचे कौतुक केले. त्यांनी ट्वीटमध्ये दीपिकाला टॅग करत लिहिले की, “तुझा अभिमान वाटतो दीपिका.” यामध्ये त्यांनी बेशरम आणि फीफा विश्वचषकाचाही उल्लेख केला.

फीफाचा निकाल आणि दीपिकाचा सिनेमा
मागील 29 दिवसांपासून कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक 2022 मध्ये 63 सामने खेळले गेले. त्यानंतर रविवारी (दि. 18 डिसेंबर) लुसेल स्टेडिअममध्ये अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा फीफा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळवला.

दुसरीकडे, दीपिकाच्या ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सध्या दीपिका या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमासाठी खूपच उत्सुकता लागली आहे. (actress deepika padukone becomes first indian to unveil fifa world cup 2022 trophy)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला फक्त पैसा…’, अंकिता लोखंडेने सांगितले विकी जैनसोबत लग्न करण्याचे धक्कादायक कारण
सुशांतसोबत ब्रेकअपनंतर पूर्णपणे तुटली होती अंकिता, नंतर ‘असा’ थाटला विकी जैनसोबत संसार

हे देखील वाचा