सुशांतसोबत ब्रेकअपनंतर पुर्णपणे तुटली होती अंकिता लोखंडे, नंतर ‘असा’ थाटला विकी जैनसोबत संसार


‘पवित्र रिश्ता’ या टेलिव्हिजन मालिकेतून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही. नुकतीच अंकिता विकी जैन याच्यासोबत लग्न करून मिसेस जैन झाली आहे. लग्नाच्या फोटोंवरून लक्षात येते की, अंकिताने तिच्या पतीसोबत लग्नातील प्रत्येक क्षण एन्जॉय केला. अंकिता आणि विकी १४ डिसेंबरला एक झाले. पण एक वेळ अशी होती, जेव्हा अंकिता तिचे पहिले प्रेम सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या दु:खात स्वतःला विसरली होती, तेव्हा विकीने तिचा हात धरला होता. अंकिताच्या आयुष्यातील आजचा दिवस खूप खास आहे. अंकिता रविवारी (१९ डिसेंबर) तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. आत्तापर्यंत तिने खूप मेहनत केली आणि टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केला. चला तर मग तिच्या वाढदिवशी तिचा प्रवास जाणून घेऊया…

सुशांत सिंग राजपूतसोबत एकत्र राहण्याचे होते स्वप्न
‘पवित्र रस्ता’ दरम्यान अंकिता आणि सुशांतची मैत्री इतकी घट्ट झाली की, दोघांनाही ते एकमेकांसाठी परफेक्ट वाटत होते. पण सुशांतची बॉलिवूडमध्ये आगमन झाल्यानंतर हळूहळू सगळच बदलले. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ नात्यानंतर, २०१६ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि ते वेगळे झाले आणि त्यांनी एकत्र पाहिलेली सर्व स्वप्ने तुटली.

ब्रेकअपनंतर २.५ वर्षे राहिली अस्वस्थ
एका मुलाखतीत अंकिता म्हणाली होती की, “लोकांना वाटते की मी सुशांतला सोडले, पण हे खरे नाही.” अंकिता म्हणाली होती की, “सुशांतने त्याचे करिअर निवडले आणि पुढे गेला. मी त्याला असे करण्यापासून रोखले नाही, परंतु माझ्यासाठी सर्व काही संपले. अडीच वर्षे मला काय करावे समजत नव्हते, पण या काळात माझे आई-वडील नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला पाठिंबा तर दिलाच, पण पूर्ण वेळही दिला.” तिने सांगितले की, “या अडीच वर्षात मी फक्त हरवलेच नाही, तर पुन्हा काम करण्याच्या स्थितीतही नव्हते.”

पार्टीत झाली विकी आणि अंकिताची भेट
अंकिता आणि विकी (Vicky Jain) हे आधीच मित्र होते. ब्रेकअपनंतर अंकिताने कुठेही जाणे, लोकांशी बोलणे, भेटणे बंद केले होते, पण या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तिने पुन्हा मित्रांसोबत राहायला सुरुवात केली. मित्राच्या पार्टीत तिची भेट विकी जैनशी झाली. दोघांचे बोलणे झाले आणि मैत्री झाली.

२०१८ मध्ये विकीसोबतचे प्रेम केले अधिकृत
अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर २०१८ मध्ये शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, पण दोघांनीही आपल्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेतलं आणि मग ठरवले की, आता लग्न करायचे.

अंकिताला दिली प्रत्येक वेळी साथ
सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता तुटली होती. अशा परिस्थितीत विकीने तिला प्रत्येक वेळी मित्राप्रमाणे सांभाळले. लोकांनी तिच्यावर आरोप केले आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले गेले. २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतरही तिच्याकडे बोटे दाखवण्यात आली होती. तिच्यावर वाईट कमेंट्स केल्या गेल्या, पण विकी नेहमी तिच्या पाठीशी उभा राहून तिला पूर्ण पाठिंबा दिला.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!