मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही तिच्या तब्येतीमुळे भलतीच चर्चेत होती. ती रुग्णालयातही दाखल झाली होती. मात्र, आता दीपिका नुकतीच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘द बिझनेस ऑफ फॅशन’ या कार्यक्रमात काईली जेनर, नताशा पूनावाला, चार्ली एक्ससीएक्स आणि एली गोल्डिंग यांच्यासोबत झळकली. सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जेडन स्मिथ, जेरेड लेटो, पालोमा एल्सेसर आणि कार्ली क्लॉसही दिसत आहेत.
या कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने जॅकेट आणि पँटच्या खाली सोनेरी रंगाचा टॉप परिधान केला होता. तसेच, तिने काळ्या रंगाचे हील्स घातले होते. तसेच, बॅगही जवळ बाळगली होती. रेड कार्पेटवर दीपिकाने अनेक कलाकारांसोबत पोझ दिले. या कार्यक्रमात इतरही कलाकार होते. त्यामध्ये एफकेए टिग्स, खाबी लेम, ऍश्ले ग्रॅहम, कोको रोचा यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.
या कार्यक्रमात दीपिकाने भारतीय अभिनेते, अभिनेत्रींची प्रतिमा वाढवण्याच्या एका प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली की, “मी नेहमीच जे करते, ते एका उद्देशाने करते. माझा प्रयत्न असतो की, मी जे काही करेल, ते जरा हटके असावे. मी नेहमीच प्रश्न विचारते की, प्रतिनिधित्व करण्याची कमतरता का आहे? कास्टिंग नेहमी एकाच ठरवलेल्या पद्धतीने का होते. मला अपेक्षा आहे की, मी याबद्दल जास्त कठोर शब्दांचा वापर केला नाहीये.”
View this post on Instagram
तिने पुढे बोलताना असेही म्हटले की, “मी नेहमीच विश्वास दाखवला आहे की, मी आपल्या प्रवासात जे काही करू शकते, जर मी बदल आणू शकते, तर माझा उद्देश माझ्या कलेच्या माध्यमातून आणि मी जे करते, त्या माध्यमातून ते पूर्ण होईल. मी प्रत्येक सकाळी एका उद्देशाने उठते. मला माझ्यासारख्या लाखो मुलींच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. जेव्हा तुम्हाला ज्यूरीचा भाग म्हणून कान फिल्म कार्यक्रमात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, किंवा बोफ 500 कव्हरचा भाग बनणारे पहिले भारतीय बनता, तेव्हा चांगले वाटते. मी आभारी आहे.”
View this post on Instagram
आजारी असण्याच्या चर्चा
माध्यमांतील वृत्तामध्ये अभिनेत्री रुग्णालयात दाखल झाल्याचा दावा केला गेला. या आठड्याच्या सुरुवातीला दीपिका आपली आई उज्जला पदुकोण यांच्यासोबत मुंबईतून बाहेर गेली. मात्र, असे वृत्त आहे की, दीपिकाला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिच्यावर अनेक चाचण्या केल्या. कारण, तिला अस्वस्थ वाटत होते.
दीपिकाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘पठाण’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते
चित्रपटापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘या’ पाच वेबसीरिज, पाहा यादी