Tuesday, March 5, 2024

कडाक्याच्या थंडीमध्ये भररस्त्यात फिरताना दिसली दीपिका; लूक पाहून युजर्सनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. दीपिका पदुकोणचे लाखो चाहते आहेत. दीपिका पदुकोण सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. दीपिका पदुकोणचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. मग तो तिचा रेड कार्पेट लूक असो किंवा कोणताही ड्रेस. दीपिका पदुकोणच्या उन्हाळ्याच्या लुकबरोबरच हिवाळ्यातील लुकने ही चाहत्यांना वेड लावले आहे. बुधवारी ही अभिनेत्री मुंबई विमानतळावर दिसली. या वेळी ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसली. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची जीन्स , तपकिरी बूट आणि जांभळ्या जाकीटसह पांढरा हाय नेक टॉप घातला होता. यासोबत तिने तपकिरी रंगाची बॅग घेतली होती. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘हृदयाची राणी’. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, “खूप सुंदर लूक.” तिसऱ्या चाहत्याने लिहिले, “माझी सर्वात आवडती दीपू”

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

 दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर , ही अभिनेत्री लवकरच हृतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कल्की प्रभाससोबत 2898 एडी आणि अजय देवगणच्या सिंघम अगेनमध्ये दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्रीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटात ती अजय देवगणच्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. 2005 मध्ये ती पहिल्यांदा हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. या म्युझिक व्हिडिओनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 2007 मध्ये शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दिसली. (Actress Deepika Padukone photo in winter special look goes viral)

आधिक वाचा-
ब्रेकिंग! ‘लगान’च्या सिनेमॅटोग्राफरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहते शोकसागरात
अखेर प्रतीक्षा संपली! ‘वॉर 2’ चित्रपट‘या’ दिवशी होणार रिलीज; निर्मात्यांनी दिली मोठी माहिती

हे देखील वाचा