Thursday, September 28, 2023

‘Kaavaalaa’ गाण्यावर डान्स करताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कट’

छोट्या पडद्यावरील ‘दीया और बाती हम’ ही मालिका चांगलीच गाजली. ही मालिका आणि त्यातील पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. मालिकेत ‘संध्या बींदणी’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री दीपिका सिंग हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने मालिकेतून घराघरात ओळख मिळवली आहे. अभिनयाव्यतिरिक्त दीपिका तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. अशात तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती जोरदार चर्चेत आहे. या व्हिडिओमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.

दीपिका सिंग (Deepika Singh) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती डान्स करताना दिसत आहे. दीपिका ही प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) हिच्या लेटेस्ट ‘कावला’ (Kaavaalaa) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दीपिकाच्या या ट्रेंडिंग गाण्यावरील व्हिडिओवर 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि 3 हजारांहून अधिक कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत 5 लाकांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मात्र, या गाण्यावर डान्स करून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Singh (@deepikasingh150)

या व्हिडिओत दीपिका काळ्या रंगाच्या टी शर्ट आणि आकाशी रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहे. तिचा हा डान्स काहींना आवडला आहे, तर काहींनी यावर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “हिचा डान्स कुणीतरी बंद करा यार.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “एवढा खराब डान्स आजपर्यंत पाहिला नाही.” आणखी एकाने कमेंट केली की, “ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कट.” एकाने असेही लिहिले की, “डान्स चांगला आहे, पण पुन्हा करू नकोस.” एका युजरने कमेंट केली की, “सगळा मूड खराब केला.”

Deepika-Singh-Troll
Photo Courtesy: Instagram/deepikasingh150

दीपिका सिंगच्या मालिका
‘दीया और बाती हम’ या मालिकेव्यतिरिक्त दीपिकाने अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘टीटू अंबानी’, ‘कवच’, ‘ये हैं मोहब्बतें’ यांचा समावेश आहे. (actress deepika singh trolled over dancing on kaavaalaa song troll see video)

हेही वाचा-
हुबेहूब सुशांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून हादरले चाहते; राखी सावंतही म्हणाली, ‘तो बदला घेण्यासाठी…’
‘मासिक पाळीत देवळात जावंसं वाटतं जा…, विज्ञानाची माती करू नका!’, हेमांगी कवीची लक्षवेधी पोस्ट

हे देखील वाचा