Monday, September 25, 2023

बापरे…एवढी हिंमत! तमन्नाला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा घेरा, हात पकडताच अभिनेत्रीने…

साऊथ ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. तमन्ना तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वच गोष्टींमुळे चर्चे असता. नुकतेच तिचे ‘कावाला’ हे आयटम साँग रिलीज झाले होते, जे देशभरात गाजत आहे. या गाण्यामुळे तमन्नाच्या चाहत्यावर्गात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तमन्ना जिथे कुठे जाते, तिथे ती चाहत्यांना भेटते. असेच काहीसे, सोमवारी (दि. 07 ऑगस्ट) पाहायला मिळाले. तमन्ना एका कार्यक्रमासाठी गेली होती. त्याचवेळी एका चाहत्याने असे काहीतरी केले,  त्यानंतर तमन्नाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) केरळ येथील एका कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमात तमन्ना पारंपारिक अवतारात पोहोचली होती. तमन्नाने हिरव्या रंगाची चमकदार साडी परिधान केली होती. या पेहरावात खूपच सुंदर दिसत होती. तिने आपला लूक टेंपल ज्वेलरीने पूर्ण केला होता.

चाहत्याने भेदला सुरक्षा घेरा
या कार्यक्रमातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओथ तमन्ना कार्यक्रम आटोपून तिथून जात असते, तेव्हाच अचानक एक चाहता सुरक्षा घेरा भेदत तमन्नाकडे धावत येतो. तसेच, तो चाहता तिचा हातही पकडतो. तमन्नाच्या सुरक्षा रक्षकांना काहीही कळायच्या आत चाहता तमन्नाजवळ पोहोचतो.

तमन्नाने हाताळली स्थिती
सुरक्षा घेरा भेदताच तमन्नाचे सुरक्षा रक्षक चाहत्याला दूर सारू लागतात. मात्र, तो तमन्नाला भेटण्याचा हट्ट करू लागतो. यावर तमन्ना भाटियाची रिऍक्शन (Tamannah Bhatia Reaction) पाहण्यासारखी असते. ती यावेळी स्थिती शांत करते आणि सुरक्षा रक्षकांना त्या मुलाला भेटू देण्यास सांगते. त्यानंतर तमन्ना त्या चाहत्यासोबत हातमिळवणी करत सेल्फीही काढते. आता या दरम्यानचा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

तमन्नाचे सिनेमे
तमन्ना भाटिया हिच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘जेलर’ सिनेमात दिसणार आहे. ती अखेरची ‘लस्ट स्टोरीज 2‘ या सिनेमात दिसली होती. यामध्ये तमन्नासोबत विजय वर्मा हादेखील दिसला होता. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती. या सिनेमाच्या रिलीजनंतर तमन्नाने विजय आणि तिचे नाते अधिकृतही केले होते. (actress tamannaah bhatia fan breaches security to meet her see her reaction)

हेही वाचा-
‘ही मूर्खांची दुनिया, हिंमत असेल तर…’, ट्रोलर्सवर कडाडला ‘तारा सिंग’
Dada Kondke | मनोरंजनाचा वादा म्हणजेच ‘दादा’

हे देखील वाचा