Thursday, June 13, 2024

हुबेहूब सुशांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून हादरले चाहते; राखी सावंतही म्हणाली, ‘तो बदला घेण्यासाठी…’

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे 3 वर्षांपूर्वी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले होते. अचानक जगाचा निरोप घेणारा सुशांत आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. चाहत्यांमुळे तो नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड होत असतो. टीव्हीपासून कारकीर्दीची सुरुवात करणारा सुशांत बॉलिवूडचा स्टार अभिनेता बनला होता. त्याने अनेक हिट सिनेमे दिले होते. अशात सुशांत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती हुबेहूब सुशांतसारखा दिसतो. या व्हिडिओवर राखी सावंत हिनेदेखील कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती हुबेहूब सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्यासारखा दिसत आहे. हा रील व्हिडिओ समोर येताच, सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी या इन्फ्लुयएन्सरला एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुशांतसारखे दिसण्यासाठी जोरदार ट्रोलही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी काय म्हणाली?
एका युजरने इंस्टाग्रामवर हुबेहूब सुशांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर राखी सावंत (Rakhi Sawant) हिनेही कमेंट केली. सुशांतसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव डोनिम अयान आहे. एआयचा वापर केल्यामुळे त्याचा चेहरा खूपच मिळता जुळता दिसत आहे. त्याला पाहून चाहते भलतेच हैराण झाले आहेत. या इंस्टाग्रामवर राखीने कमेंट करत लिहिले आहे की, “तो बदला घेण्यासाठी परत आला आहे, कर्म.”

Rakhi-Sawant-Comment
Photo Courtesy: Instagram/viralbhayani

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दुसरीकडे, एका युजरने लिहिले की, “असे वाटत आहे, देवाने सुशांत सिंग राजपूतला परत पाठवले आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “शेवटी सुशांत परत आलाच. आम्ही तुझी खूप आठवण काढली भावा.” एकाने या इन्फ्लुयएन्सरला ट्रोल करत लिहिले की, “हे फेक आहे. प्रसिद्धीसाठी सुशांतच्या नावाचा वापर करतोय. त्याला अनफॉलो करा.”

सुशांतचे सिनेमे
सुशांतने कारकीर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्याने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात ओळख मिळवली होती. त्यानंतर त्याने 2013मध्ये ‘काय पो छे’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर तो ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमात झळकला. यानंतर सुशांतने ‘पीके’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्येही काम केले. यातूनच त्याने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. सुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ हा होता. हा सिनेमा त्याच्या निधनानंतर रिलीज झाला होता. हा सिनेमा पाहून चाहत्यांच्या भावनांचा बांध तुटला होता. आज सुशांत या जगात नसला, तरीही चाहत्यांच्या मनात कायम राहील. (late actor sushant singh rajput doppelganger video goes viral on social media)

हेही वाचा-
‘मासिक पाळीत देवळात जावंसं वाटतं जा…, विज्ञानाची माती करू नका!’, हेमांगी कवीची लक्षवेधी पोस्ट
बापरे…एवढी हिंमत! तमन्नाला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा घेरा, हात पकडताच अभिनेत्रीने…

हे देखील वाचा