Saturday, July 26, 2025
Home टेलिव्हिजन ‘मी त्याच्यापेक्षा 1000 पटींनी चांगला होतो, मला का नाकारलं?’, देवोलीनाच्या लग्नामुळे ‘हा’ अभिनेता भावूक

‘मी त्याच्यापेक्षा 1000 पटींनी चांगला होतो, मला का नाकारलं?’, देवोलीनाच्या लग्नामुळे ‘हा’ अभिनेता भावूक

छोट्या पडद्यावर ‘गोपी बहू‘ साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी होय. देवोलीना ही काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्यासोबत संसार थाटला. दोघांची जोडी काहींना खटकली, पण हे जोडपं त्यांच्या आयुष्यात सुखी आहे. तिच्या लग्नावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांना वाटत होते की, देवोलीना ही विशाल सिंग याला डेट कतर आहे. मात्र, जेव्हा तिने शाहनवाजसोबत संसार थाटला, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिच्या लग्नामुळे अनेकांचे हृदय तुटले. यामध्ये कमाल आर खान म्हणजेच केआरके याचाही समावेश होता.

अभिनेता, दिग्दर्शक, आणि निर्माता असलेला कमाल आर खान (Kamaal R Khan) याने काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते की, “6 दिवसांपूर्वी देवोलीना विशाल सिंग याच्यासोबत लग्न करण्यासाठी पूर्णपणे तयार होती. मात्र, आज ती अचानक शाहनवाजसोबत लग्न करते का? नक्कीच त्यांच्यात काही ना काही झाले आहे.”

केआरकेचा ट्वीट रिट्विट करत अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने लिहिले की, “तू खूपच मजेशीर आहेस केआरके. बाकी तुझा दिवस चांगला जावो.”

केआरके (KRK) याने देवोलीनाच्या मेसेजवर प्रत्युत्तर दिले. त्याने आधी तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छांसोबतच त्याने त्याच्या वेदनाही सांगितल्या. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे वैवाहिक आयुष्य सुखात जावो. मात्र, माझ्यावर विश्वास ठेव. मी शाहनवाज शेखपेक्षा 1000% चांगला आहे. तू मला का नाकारलं?”

शाहनवाज शेख (Shahnawaz Sheikh) आणि देवोलीना भट्टाचार्जी यांच्या लग्नाच्या बातमीने केआरकेला दु:खी केले आहे. मात्र, तिच्या प्रत्युत्तराने केआरकेचा दिवस खास बनवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीनाबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘साथ निभाना साथिया’, ‘ये हैं मोहब्बतें’, ‘छोटी सरदारनी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (actress devoleena bhattacharjee rejects krk love proposal kamaal r khan upset with her decision)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पळा पळा! पतीसोबत असताना नयनताराला चाहत्यांनी घेरले, गर्दीतून धावतानाचा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
मोनालिसाने ‘अंग लगा…’वर कंबर लचकवत वेधले चाहत्यांचे लक्ष; ठुमका पाहून चाहताही म्हणाला, ‘जीवच जाईल’

हे देखील वाचा