Friday, April 19, 2024

‘गोपी बहू’अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर हळदी समारंभाच्या फोटोचा कहर…

टीव्ही स्टार प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिने अनेक कार्यक्रमामध्ये काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘साथ निभाना साथिया‘ या मालिकेपासून केली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. यानंतर तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता मात्र, लवकरच ती घराबाहेर पडली. सध्या अभिनेत्री आपल्या मालिकांमुळे नाही तर वैयक्तीक आयुष्यामुलळे चर्चेत आली आहे.

गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) हिने आपल्या दमदार अभिनेयाने टीव्ही क्षेत्रामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मात्र, अभिनेत्रीबाबत नुकतंच एक मोठी बातमी समोर येत आहे. देवोलिना गपचुप लग्न करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाउंटवरुन हळदी समारंभाचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री हळदीच्या रंगामध्ये रंगली आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड विशाल सिंग (Vishal Singh) देखिल दिसून येत आहे. दोघेही हळदी समारंभाचा जोरदार आनंद लुटताना दिसून येत आहे.

devileena bhattacharjee
Photo Courtesy: Instagram/devoleena

टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना आणि तिचा बॉयफ्रेंड विशाल सिंग यांच्या हळदीचे फोटो पाहूण चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यासोबतच सोशल मीडिवर याच्या लग्नाच्या चर्चांना चांगलेच उधान आले आहे. झाले असे की, देवोलिना हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हळदीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या हातांवर मेहंदी आणि चेहऱ्यावर हळदी लावलेली असून अभिनेत्री नवरीच्या रुपात लनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचा बॉफ्रेंड विशाल सिंग दिसून येत आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, देवोलिना लग्न करत आहे का? चाहत्यांनामध्ये तिच्या लग्नाने खळबळ माजली आहे.

 

View this post on Instagram

 

माध्यनमातील वृत्तानुसर अभिनेत्री आपल्या भावच्या लग्नासाठी गुहाटीमध्ये पोहोचली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांना प्रश्न पजला होता. कारण काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये विशाल दोबोलिनाला प्रपोज करताना दिसून येत होता. मात्र, दोघांनीही ही अफवा थांबवली आणि प्रेक्षकांना खरेत सांगितले की, ते एका म्युजिक व्हिडिओचे प्रमोशन करत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

नकारात्मक भूमिका साकारून सुपरस्टार झालेले ‘हे’ आहेत टॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार, जाणून घ्या
हॉट निया शर्मा! टीव्ही अभिनेत्रीच्या बोल्डनेसने केली हद्दपार…

 

हे देखील वाचा