घटस्फोट होऊनही मैत्री कायम! दिया मिर्झाकडून पहिल्या पतीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; फोटो केला शेअर


बॉलिवूडमध्ये आपण अनेक नाती तुटताना आणि बनताना पाहिली आहेत. मात्र, यातील काही नाती अशीही असतात, जी तुटल्यानंतरही आपला संवाद सुरू ठेवतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच सौंदर्यवती अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल संघा होय. घटस्फोटानंतरही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दियाने आपला पहिला पती साहिलच्या वाढदिवसानिमित्त त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

साहिलने शुक्रवारी (१६ जुलै) आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने दियानेही त्याला आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. (Actress Dia Mirza Drops Birthday Greetings To Her Ex Husband Sahil Sangha)

दियाने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर साहिलचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने तपकिरी रंगाचा जॅकेट आणि बेज रंगाची पँट परिधान केली आहे. त्याचबरोबर तो एका गाडीवर बसला आहे.

तिने फोटो शेअर करत “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सा,” असे लिहिले आहे. या फोटोसोबतच तिने हृदय, मिठी आणि वाघ इमोजीचाही समावेश केला.

Photo Courtesy: Instagram/diamirzaofficial

दिया मिर्झा आणि साहिल संघाने २०१९ मध्ये आपल्या ११ वर्षांचे नाते संपवण्याची घोषणा केली होती. एका अहवालातून त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि जवळच्यांसोबत ही बातमी शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, दोघेही प्रेम आणि सन्मानाने एकमेकांचे मित्र बनून राहतील.

साहिल आणि दियाने सन २०१४ मध्ये लग्न केले होते आणि सन २०१९ मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर दियाने वैभव रेखीसोबत १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न झाले होते. त्यांचे लग्न एक खासगी आणि साध्या पद्धतीने पूर्ण झाले. तसेच, दियाच्या लग्नात महिला पंडित चर्चेचा विषय बनली होती. तिने एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, तिचे लग्न एका पंडित महिलेने केले आहे. कन्यादान आणि निरोप विधी तिच्या लग्नात झाले नसल्याचेही तिने सांगितले होते. यामुळे दियाचे लग्न भलतेच चर्चेत आले होते.

याव्यतिरिक्त तिने मे महिन्यातच आपल्या पहिल्या मुलाला अव्यानला जन्म दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.