‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या या इंडस्ट्रीमध्ये आल्या आणि त्यांच्या अभिनयाने त्यांनी तुफान वाहवा मिळवली. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अशा अभिनेत्रींनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. मात्र, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही या अभिनेत्री चित्रपटांमधून दिसेनाशा झाल्या. मधेमधे चित्रपटांमध्ये लहानलहान भूमिका करणाऱ्या अशा अभिनेत्रींच्या यादीतले एक नाव म्हणजे चित्रांगदा सिंग.

चित्रांगदा आज भलेही चित्रपटांमध्ये कमी दिसते किंबहुना दिसतच नाही. मात्र, ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि वेगवेगळे व्हिडिओ शेअर करताना दिसते. आज जरी चित्रांगदा पडद्यावर कमी दिसत असली, तरी तिच्या लोकप्रियतेत जरा देखील घट झालेली नाही. त्याच्या स्टाईलची आणि सौंदर्याची चर्चा आजही सोशल मीडियावर होताना दिसते.

चित्रांगदाने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चित्रांगदाने ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसली असून, यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, ‘सुंदर आणि सुशील वाइब्स.’

या फोटोंमध्ये चित्रांगदाने लेसचे ब्लाउज घातले असून, मोठे कानातले घातले आहे. तिने केस बांधले असून, यासोबत तिने फ्रिलची साडी नेसली आहे. तिचे हे फोटो आणि हा लूक चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या आणि कलाकारांच्या देखील कमेंट्स येत आहेत.

चित्रांगदाला शेवटचे २०१८ साली आलेल्या ‘बाजार’ सिनेमात पाहिले गेले. त्यानंतर तिने ‘घुमकेतू’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. यापूर्वी ती सन २०११ मध्ये आलेल्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातही झळकली होती. यात तिच्यासोबत दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत होते. आता सध्या ती ‘बॉब बिस्वास’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.