टेलिव्हिजन आणि बॉलिवूड कलाकार आता होळी साजरी करण्यासाठी तयार झाले आहेत. मात्र यादरम्यान दिशा परमार (Disha Parmar) रंगाना टाळताना दिसत आहे. तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री जेव्हा कॅमेऱ्यासमोर पोझ देत होती, तेव्हा तिला असे वाटते की कोणीतरी तिच्यावर रंग टाकणार आहे. अशा वेळी तिच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडते, पण हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा परमार तिच्या चाहत्यांना रंग लावण्यास नकार देताना दिसत आहे आणि होळीच्या शुभेच्छा देताना देखील दिसत आहे.
दिशा परमार या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, “होळीच्या शुभेच्छा, सुरक्षित रहा आपल्या घरी होळी खेळा, जास्त बाहेर जाऊ नका.” हा खास संदेश दिल्यानंतर आणि मीडियाशी गप्पा मारल्यानंतर दिशा गाडीतून निघून गेली. यादरम्यान, अभिनेत्री मेकअपशिवायही खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी तिने डेनिम जॅकेट आणि काळी जीन्स परिधान केली होती. अभिनेत्रीची स्टाईल अतुलनीय दिसत आहे. यासोबतच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.
मीडिया चॅनलने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओमध्ये दिसणारी दिशा परमारची ऍक्शन आणि प्रतिक्रिया पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. त्याचवेळी तिला क्यूटी म्हणून देखील चाहते हाक मारत आहे. तर एका युजरने लिहिले की, “तिला होळीची भीती वाटत नाही सर, न जाणाऱ्या रंगाची भीती वाटते असे दिसते.”
अलीकडेच दिशा परमारने पांढऱ्या रंगाच्या साडीत तिचे आनंदाने भरलेले फोटो शेअर केले होते. सेटवर होणाऱ्या होळीचा रंगही तिच्या चेहऱ्यावर उमललेला दिसत होता. ही आनंदी फोटो शेअर करताना दिशा परमारने कॅप्शनमध्ये लिहिले की की, “रंगी साडी गुलाबी चुनारिया रे, मोहे मारे नजरिया सावरिया रे.”
राहुल वैद्य ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये त्याचा प्रवास खूप पसंत केला गेला होता. या शोदरम्यान, व्हॅलेंटाइनच्या खास प्रसंगी राहुल वैद्यने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले. ज्यामध्ये त्याला त्याचा मित्र अली गोनीने मदत केली होती. राहुल वैद्य ‘बिग बॉस’च्या घरात असताना दिशा त्याला सोशल मीडियावर सतत पाठिंबा देत होती.
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे १६ जुलै २०२१ रोजी लग्न झाले. या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –