Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड चाळिशी पार करूनही एकटी जगतेय आयुष्य, साखरपुडा झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने दिलेला धोका

चाळिशी पार करूनही एकटी जगतेय आयुष्य, साखरपुडा झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने दिलेला धोका

वीर झारा‘ आणि ‘दिल्ली 6’ या सिनेमांसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता होय. दिव्याने आतापर्यंत शंभराहून अधिक सिनेमात काम केलंय. तिने तिच्या अस्सल अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. हीच दिव्या रविवारी (दि. 25 सप्टेंबर) तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिव्याचा अभिनय तिच्या चाहत्यांना भलताच आवडतो. कधीकधी तर ती मुख्य अभिनेत्रीवरही भारी पडलीये. रुपेरी पडद्यावर हसतमुख असणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र खूपच एकटी आहे. चाळिशी ओलांडूनही तिच्या वैयक्तिक आयुष्यात बहर आला नाही.

अजूनही अविवाहित आहे दिव्या
अनेक रोमँटिक सिनेमात झळकलेली अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) ही खऱ्या आयुष्यात आजही एकटीच आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिव्या हिने भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कमांडर संदीप शेरगिल (Sandeep Shergill) यांच्याशी साखरपुडा केला होता. मात्र, लवकरच त्यांचा साखरपुडा मोडला गेला. या घटनेमुळे दिव्या इतकी खचली की, तिने आजपर्यंत लग्नाबद्दल विचारही केला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

लहानपणी वाचवला आईचा जीव
अभिनेत्री दिव्या हिने तिच्या पुस्तकात याचा खुलासा केला आहे की, तिने कशाप्रकारे तिच्या आईचा जीव वाचवला होता. दिव्या ही 10 वर्षांची होती. ती आई नलिनीसोबत दिल्लीमध्ये बोटिंग करण्यासाठी निघाली होती. यादरम्यान तिची आई होडी चालवणाऱ्या व्यक्तीशी भांडली आणि अचानक ती तलावात पडली. त्यावेळी मुलगी दिव्याने मागे-पुढे न पाहता आईला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली आणि आईचा जीव वाचवला. दिव्याने तिच्या पुस्तकात आपल्या बालपणीचे अनेक रंजक क्षण शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

आपल्या भूमिकांमध्ये ओतला जीव
दिव्या हिला ‘इरादा’ या सिनेमासाठी 2018 साली पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या सिनेमात तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसी, शरद केळकर, सागरिका घाटगे यांसारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिव्या ही तिच्या शानदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने ‘झी सिने अवॉर्ड’, ‘आयफा अवॉर्ड’ असे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. विशेष म्हणजे, तिने 2017 साली ‘इश्क में जीना इश्क में मरना’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

तिच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर दिव्या ‘शर्मा जी की बेटी’ आणि ‘जिला कनौज’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘मला हे सर्व का मिळाले…’, ट्रोलिंगनंतर नेहा कक्करने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
आलियाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर, जबरदस्त ॲक्शन सीन करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा