अभिनेत्री प्रीति झिंटाच्या पंजाब संघात ‘शाहरुख खान’ची दिमाखात एंट्री, चाहते म्हणाले, शेवटी ‘वीर- झारा’ भेटलेच

Preity Zinta Bought Shahrukh Khan For Kings XI Punjab Twitter User Said Finally Veer And Zara Met


बॉलिवूड आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्याला क्रिकेटमध्ये संंघांना पाठिंबा देताना दिसतात. जर जगप्रसिद्ध टी२० लीग आयपीएलबाबत बोलायचं झालं, तर अनेक सेलिब्रिटी आयपीएल संघांचे मालकही आहेत. यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीति झिंटा हिचाही समावेश आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे आयपीएल २०२१ चा लिलाव पार पडला. यादरम्यान पंजाब इलेव्हन (किंग्ज इलेव्हन पंजाब) संघाची मालकीण प्रीति झिंटा आणि किंग शाहरुख खान चर्चेत आले. या दोघांच्याही चाहत्यांकडून हे ऐकायला मिळत आहे की, ‘वीर झारा’ची भेट झाली आहे. यामागे एक खूपच रंजक कारण आहे. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया…

खरंतर गरुवारी झालेल्या आयपीएलमधील लिलावात सर्व संघांनी अनेक नवे खेळाडू आपल्या संघात सामील केले. यादरम्यान पंजाब संघात ९ खेळाडूंना सामील करण्यात आले. यापैकी एक खेळाडू तमिळनाडूचा आहे. विशेष म्हणजे या खेळाडूचे नाव ‘शाहरुख खान’ असे आहे.

शाहरुखला आपल्या संघात सामील केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. यादरम्यानचा एक व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रीति झिंटा कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला चिडवताना दिसत आहे. तिने जोरजोरात ओरडत म्हटले की, “आम्हाला शाहरुख खान मिळाला आहे.” हा क्षण खूपच रंजक होता.

यानंतर ट्विटरवर चाहत्यांनी जोरदार व्हिडिओ शेअर केले. एका चाहत्याने लिहिले की, “शेवटी वीर आणि झारा भेटलेच.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “केकेआरनंतर किंग्ज इलेव्हन पंजाबलाही शाहरुख खान मिळाला.” तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, “प्रीति झिंटाने शाहरुख खानसोबत पदार्पण केल्यानंतर शाहरुख खानला आयपीएलमध्ये पदार्पण करवले.”

खरं तर प्रीति झिंटाच्या पंजाब संघाने क्रिकेटपटू शाहरुख खानला ५.२५ कोटी रुपयांच्या किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. यासोबतच या संघात झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ आणि शाहरुख खानसोबत ९ खेळाडूंना आपल्या संघात सामील केले आहे.

प्रीति झिंटा आणि शाहरुख खान यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘कल हो ना हो’ सारख्या चित्रपटाचा समावेश आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.